प्रतिनिधी l शिंदखेडा : महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना जयकुमार भाऊ रावल यांच्या १६ जानेवारीस येणाऱ्या वाढदिवसानिमित्त निरगुडी ता शिंदखेडा येथे दि १२ जानेवारी सोमवारी सकाळी दहा वाजता भव्य रक्तदान शिबिरासह महाआरोग्य शिबिर व गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन भाजपा तालुका सरचिटणीस (ग्रामीण ) अमोल राजपूत यांनी केले होते.
या कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने केला गेला.कार्यक्रमाचे अध्यक्षपदी माजी जि प सदस्य डी आर बोरसे यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून पं स सदस्य डॉ प्रा उपप्राचार्य विशाल पवार,भाजपा गटनेते प्रतिनिधी चेतन परमार, शिंदखेडा नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगरसेवक सुयोग भदाणे,मनोहर पाटील,प्रतिनिधी दादा मराठे, संदीप राजपुत, भाजपा शहराध्यक्ष संजयकुमार महाजन , देविदास कोळी, विरेंद्र गिरासे,अतुल बोरसे, माजी सरपंच खडकसिंग गिरासे यांनी उपस्थिती दिली.मान्यवारांच्या सत्कारानंतर गावातील ज्येष्ठ नागरिकांचा भव्य नागरी सत्कार करून निरगुडी गावास विकासाच्या वाटेवर आणण्याचा संकल्प अमोल राजपूत यांनी केला.कार्यक्रमात डी आर बोरसे, डॉ प्रा उपप्राचार्य विशाल पवार, नगरसेवक सुयोग भदाणे, देविदास कोळी यांनी मनोगते व्यक्त करून आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी रक्तदानाचे महत्त्व पटवून देणे आणि गरजू लोकांना आरोग्य सेवा पुरवणे हा या शिबिरांचा मुख्य उद्देश होता.रक्तदान शिबिरात ५२ रक्तदात्यांनी रक्त देऊन ना मंत्री साहेब जयकुमार रावल यांच्यावर असणारी निष्ठा सिद्ध केली.रक्तदान शिबिरास धुळे येथून श्रीमती के सी अजमेरा रोटरी ब्लड सेंटर यांच्या पथकाने उपलब्धता दिली तसेच महाआरोग्य शिबिरात मधुमेह तपासणी, थायरॉईड, रक्तदाब तपासणी अशा विविध आजरांच्या ३००+ गरजू नागरिकांनी लाभ घेतला.या शिबिरास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ विनय पवार व त्यांचे पथकाचे अमूल्य सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा शहराध्यक्ष संजयकुमार महाजन यांनी केले तर आभार रमेश मिस्तरी यांनी केले.
0 Comments