जायँट्स वेलफेयर फौंडेशन च्या फेडरेशन 2अ तसेच जायँट्स परिवार दोंडाईचा चा शपथ विधी व पदग्रहण समारंभ आज दोंडाईचा येथील प्रताप रॉयल्स इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये संपन्न झाला, ज्या मध्ये बे भरोसे हॉटेल चे मालक भिमलिंग शिवलिंग लिंभारे यांना फेडरेशन 2अ चे अध्यक्ष तसेच त्यांच्या कार्यकारिणी ला शपथ जायँट्स वेलफेयर फौंडेशन चे विश्व उपाध्यक्ष श्री विजयकुमार चौधरी यांनी दिली. कार्यक्रम साठी मुख्य अतिथी म्हणून विकासरत्न व उद्योजक सरकारसाहेब रावल, फौंडेशन चे सेंट्रल कमिटी सदस्य रविंद्र जमादार, फौंडेशन चे स्पेशल कमिटी सदस्य किशोर कुमार मिश्रा, गोविंद भाई पटेल, बाबुराव बगाडे, फेडरेशन चे सल्लगार चंद्रकांत जाधव, फेडरेशन सचिव कैलास भावसार, फेडरेशन संचालिका चंद्रकला सिसोदिया, फेडरेशन 2अ चे मावळते अध्यक्ष किरण शेवाळे, दोंडाईचा ग्रुप चे अध्यक्ष श्री पंकज गिरासे, सहेली ग्रुप च्या अध्यक्षा लता कोठावदे हे होते, या ठिकाणी जायँट्स दोंडाईचा परिवार चे ही शपथ ग्रहण चा कार्यक्रम संपन्न झाला ज्या मध्ये जायँट्स ग्रुप दोंडाईचा चे नूतन अध्यक्ष देवेंद्र राजपूत, सहेली ग्रुप च्या नूतन अध्यक्षा मीनाक्षी जाधव व सहेली प्राईड ग्रुप च्या अध्यक्षा सुनीता शर्मा यांना त्यांच्या तिघे ग्रुप च्या कार्यकारिणी सदस्य व नूतन सदस्यांना फेडरेशन युनिट संचालिका चंद्रकला सिसोदिया यांनी शपथ दिली, कार्यक्रम साठी फेडरेशन 2अ मधील पदाधिकारी हे नाशिक, धुळे, शिरपूर, शिंदखेडा, शहादा, अमळनेर, खामगांव, शेगाव, नागपूर इत्यादी ठिकाणावरून आले होते.
कार्यक्रम मध्ये मार्गदर्शन करतांना सरकार साहेब यांनी समाजसेवा ही आपली खरी कमाई असून तेच पुण्य कर्म हे आपल्या सोबत मृत्यू नंतर कामी येते व स्वर्ग लोकात याच बळावर आपली श्रीमंती ठरत असते म्हणून यासाठी आपण सर्वांनी नुसतं पैश्याची श्रीमंती पेक्षा कर्मा च्या श्रीमंती कडे लक्ष दिले पाहिजे, फौंडेशन चे विश्व उपाध्यक्ष यांनी समाजसेवा चे महत्व अधोरेखित करून जायँट्स चळवळ ही सर्वसामान्य साठी किती काम करते हे सांगितले, शोर कुमार मिश्रा यांनी समाज सेवा करूनच खरा आत्मआनंद प्राप्त होते हे काही उदाहरणं देऊन सांगितले.
कार्यक्रम साठी शहरातील रोटरी,, लायन्स, जैन सोशल, श्री माता भगवती विश्वस्त मंडळ चे पदाधिकारी, नगरपालिका चे गटनेते निखिल जाधव नगरसेवक प्रवीण महाजन, नरेंद्र गिरासे, चिरंजीव चौधरी, उद्योजक सुरेश जैन, कल्याण जी अग्रवाल व शहरातील विविध व्यापारी, गणमान्या स्त्री, पुरुष मंडळी उपस्थित होते *✍️✍️श्री पांडुरंग शिंंपी प्रतिनिधि दोंडाईचा.*
0 Comments