मालाड पश्चिम येथील पाटला देवी मंदिर परिसरात दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी सामाजिक कार्यकर्ते प्रमोदजी काटे यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात हिंदुत्व, समाजरचना तसेच डेमोग्राफिक बदल या महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रमोदजी काटे यांनी आपल्या भाषणात बदलत्या सामाजिक परिस्थितीचा आढावा घेत हिंदुत्वाच्या मूलभूत मूल्यांवर प्रकाश टाकला. तसेच लोकसंख्येतील बदल, त्याचा समाजावर होणारा परिणाम आणि त्यासंदर्भात नागरिकांची भूमिका याविषयी विचार मांडले.
या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे १५० पेक्षा अधिक नागरिकांनी उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घेतला. कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांमध्ये विषयाबाबत सकारात्मक चर्चा झाली.
सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीने अशा प्रकारचे उपक्रम नियमितपणे व्हावेत, अशी अपेक्षा उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
0 Comments