साक्री (प्रतिनिधी) – धुळे शहरातील यशवंतनगर येथील सामाजिक युवा कार्यकर्ते व तरुण उद्योजक अजय मोरे यांच्या साक्री येथील बसस्थानक परिसरात सुरू
करण्यात आलेल्या ‘रिद्धी’ पॉपकॉर्न स्टॉलचे उद्घाटन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या स्टॉलचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार गो. पि. लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास साक्री तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी ज्येष्ठ पत्रकार प्राचार्य बी. एम. भामरे (अण्णा), ज्येष्ठ पत्रकार प्रा. विजय भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच एस.टी. महामंडळाचे अधिकारी, प्रवासी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजय मोरे यांच्या उद्योजकतेचे कौतुक करत तरुणांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारून रोजगारनिर्मितीकडे वाटचाल करावी, असे मत व्यक्त केले. ‘रिद्धी’ पॉपकॉर्न स्टॉलमुळे बसस्थानक परिसरातील प्रवाशांना दर्जेदार व स्वादिष्ट पॉपकॉर्नची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.
0 Comments