Header Ads Widget

शिंदखेडा शहरात होणार शिवपथासाठी १३ कोटी मंजुर - ना.जयकुमारभाऊ रावल


प्रतिनिधी l शिंदखेडा : शिंदखेडा शहारासाठी अत्यंत महत्वाचा रस्ता म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवा चौक हा रस्ता राजपथच्या धर्तीवर नवीन तयार करण्यासाठी पणन व राजशीष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्हा पालक मंत्री जयकुमार रावल यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ मध्ये १३ कोटी रु. मंजुर करून शिंदखेडा शहराच्या विकासासाठी दिलेला शब्द पूर्ण केला असून शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले व भाजपा कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक व भगवा चौक येथे फटाके फोडत जल्लोष साजरा केला. 
      या रस्त्याचे काम व्हावे या मागणीसाठी माजी गटनेते अनिल वानखेडे यांच्यासह माजी नगराध्यक्षा श्रीमती रजनी वानखेडे व माजी व विद्यमान उपनगराध्यक्ष,गटनेते,सभापती, नगरसेवक, व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मागणी होती. यावेळी जल्लोष करतांना भाजपा कार्यकर्त्यांनी भगवा चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सबका साथ - सबका विकास,भाजपाच म्हणजे सर्वांचा विश्वास अशा घोषणा देत आनंद व्यक्त केला व ना.जयकुमार भाऊंचे आभार मानले. 
     प्रसंगी उपनगराध्यक्ष उदय देसले,धुळे जिल्हा चिटणीस प्रवीण माळी,शहराध्यक्ष संजयकुमार महाजन,सभापती मनोहर पाटील,सुयोग भदाणे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले,माजी शहराध्यक्ष अँड विनोद पाटील,नगरसेवक प्रतिनिधी दादा मराठे, गुलाब सोनवणे,संदीप राजपूत, चंद्रकांत सोनवणे,अबु कुरेशी,
गोपाल चौधरी,राहुल महिरे,पंडित फुले,बबलू देवरे, शाम फुले, राकेश जाधव,अमोल मोरे, महेंद्र तमखाने,दिनेश माळी,राजेंद्र मराठे,गणेश जगदाळे, उमेश गिरासे, आर एच भामरे आदीची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments