शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-
शिंदखेडा तालुक्यातील विरदेल मंडळात महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत विरदेल महसूल मंडळात शुक्रवारी (17 एप्रिल )भव्य समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर शिबीर ग्राम महसूल अधिकारी विरदेल तुषार पवार (बबलू आप्पा) यांनी नियोजनबद्ध आयोजन केले होते.या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका छताखाली 16 विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिंदखेडा विधानसभा मतदार संघाचे पणन व राजशिष्टाचार तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली तर जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, उपविभागीय अधिकारी शिरपूर शरद मंडलीक, शिंदखेडा तहसीलदार नितीनकुमार देवरे,गटविकास अधिकारी पं. स. शिंदखेडा रमेश नेतनवार, तालुका कृषी अधिकारी मनोज सिसोदे यांच्या नेतृत्वात सदर कार्यक्रम घेण्यात आला.सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांनी केले. हयावेळी प्रमुख मान्यवर माजी पं. स. सभापती जिजाबराव सोनवणे,मा. सरपंच सुवर्णा सतिष बेहेरे, उज्वल रुलर डेव्हलोपमेंट संस्थेचे अध्यक्ष आर. आर. पाटील, संचालक कृउबा साहेबराव पेंढारकर, संचालक खरेदी विक्री संघ, प्रा. प्रमोद पवार, नायब तहसीलदार शारदा बागले, विजय गोस्मावी, ग्रामपंचायत गटनेते विरदेल सतीश बेहरे, विरदेल हायस्कूल मुख्याध्यापक जे. एस. पाटील, पर्यवेक्षक एस.एस. गोसावी, माजी मुख्याध्यापक एम.पी. पाटील,अध्यात्मिक भाजप अध्यक्ष लोटन पाटील, पप्पू शिंदे,पुरवठा निरीक्षण अधिकारी नितीन नंदावार, विरदेल रेशन दुकानदार सुरेश कुंभार, दिगंबर वाणी,कृषी विभागातील सचिन राजपूत, मुकेश सोनवणे, जयपाल गिरासे, पराग पवार,निराधार योजना विभागाचे एम. एस. भावसार, पठाण दादा,ग्राम महसूल अधिकारी तुषार पवार, मंडळ अधिकारी सोनाली चव्हाण सह मंडळातील तलाठी आशिष मडोळे आच्छी, श्रीकांत साळुंखे नेवाडे, शुभम गोडे वरपाडे, वैष्णवी मानकर अमळथे, महसूल सेवक सुमित कदम तसेच विरदेल मंडळ परिसरातील आजी माजी सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,विकास सोसायटीचे चेअरमन आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शेतकरी बंधू भगिनी उपस्थित होते. सदर समाधान शिबिराबाबत ग्राम महसूल अधिकारी तुषार पवार यांनी प्रस्तावनेतुन विविध शासकीय योजनाची माहिती दिली. कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या विविध 8 विभागाचे स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आले होते. या स्टॉलच्या माध्यमातून नागरिकांना विविध दाखले, शासकीय योजनांचे अर्ज आणि तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी विरदेल मंडळातील विरदेल, आच्छी, हिसपुर,अमळथे, वरपाडे, नेवाडे,सोनेवाडी या गावातील नागरिकांसाठी हे शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात विविध दाखले वाटप करण्यात आले. यात संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना आणि राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना तसेच रेशन कार्ड, सातबारा उतारे, फेरफार नोंद, जातीचे दाखले, उत्पन्न दाखले आदि दाखले देण्यात आले. तसेच यावरील सर्व योजनांबाबत नागरिकांना नायब तहसीलदार शारदा बागले, विजय गोस्वामी, पुरवठा निरीक्षण अधिकारी नितीन नंदावार,कृषी विभागाचे सचिन राजपूत यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी विभागामार्फत यांत्रिकीकरण योजने अंतर्गत 13 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. कृषी विभागाच्या स्टॉलला जवळपास दीडशे शेतकऱ्यांनी भेट दिली त्यांच्या शंकांचे समाधान करण्यात आले. यावेळी कृषी विभागाचे सचिन राजपूत,मुकेश सोनवणे, जयपाल गिरासे, पराग पवार हे उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विरदेल ग्राम महसूल अधिकारी तुषार पवार (बबलू आप्पा), मंडळ अधिकारी सोनाली चव्हाण, तलाठी आशिष मडोळे, श्रीकांत साळुंखे, शुभम गोडे, वैष्णवी मानकर, महसूल सेवक सुमित कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.सूत्रसंचालन ज्योती निकवाडे शिक्षिका यांनी केले तसेच आभार तुषार पवार यांनी मानले.
0 Comments