दोंडाईचा (प्रतिनिधी):
दि. 16 एप्रिल 2026 रोजी दोंडाईचा पोलीस स्टेशन हद्दीत मोठी कारवाई करत अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर धडक छापे टाकण्यात आले. म्हाळसानगर, मेहतर कॉलनी, रावलनगर मागील भिलाटी तसेच मालपूर शिवार या भागांमध्ये ही संयुक्त मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईदरम्यान सुमारे ४ लाख रुपयांचा अवैध दारूचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला. तसेच संबंधित आरोपींविरुद्ध एकूण सात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक (धुळे) तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंपी, पोलीस उपनिरीक्षक इमरान खान, नकुल कुमावत तसेच पोलीस कर्मचारी राकेश रोकडे, ललित काळे, राकेश पाटील आणि होमगार्ड पथक यांनी ही कारवाई यशस्वी केली.
अवैध धंद्यांविरोधात पोलीसांचा कडक इशारा देत अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
0 Comments