मालपूर प्रतिनिधी – प्रभाकर धनगर
मालपूर येथे दिनांक १६ एप्रिल २०२६ (गुरुवार) रोजी एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. आर.सी.सी. अपंग राउंड टाऊन दोंडाईचा (रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्स पुरस्कृत) यांच्या वतीने शाळेत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या, पेन व पेन्सिलचे वाटप करण्यात आले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. एन. पाटील, संस्थेचे अध्यक्ष हुसेनभाई विरदेलवाला, पर्यवेक्षक श्री आर. के. सोनवणे उपस्थित होते. विशेष म्हणजे, हुसेनभाई विरदेलवाला यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ स्वीकारण्याऐवजी त्यांनी वह्या, पेन व पेन्सिल गोळा करून विद्यार्थ्यांना वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आर. आय. गिरासे सर यांनी केले. या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विकासरत्न आ. श्री सरकारसाहेबजी रावल, आ. नामदार श्री जयकुमार भाऊ रावल (कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य), दादासो. आ. श्री रविंद्रसिंहजी जमादार (उपाध्यक्ष), आ. सी. एन. भाऊसाहेब (सेक्रेटरी) तसेच आ. श्री ललितसिंहजी भाऊसाहेब (सचिव, सामान्य प्रशासन) यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
0 Comments