Header Ads Widget

*धुळे लोकसभा क्षेत्रात अवकाळी व गारपिटीचा तडाखा; बळीराजाला तात्काळ मदत देण्यासंदर्भात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांना निवेदन व पाठपुरावा..!*


📍 *दिल्ली-*

धुळे लोकसभा क्षेत्रात गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि तीव्र गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्री मा. श्री. शिवराजसिंह चौहान यांच्याकडे निवेदन देऊन पाठपुरावा करत तात्काळ आर्थिक मदत आणि योग्य नुकसान भरपाई देण्याची आग्रही मागणी केली. बळीराजाला या संकटातून सावरण्यासाठी त्वरित मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे आणि यासाठी धुळे लोकसभा खासदार या नात्याने मी सातत्याने आवश्यक तो पाठपुरावा करेन.

Post a Comment

0 Comments