Header Ads Widget

शिंदखेडा शहरात भगवान परशुराम जयंती उत्साहात संम्पन्न

-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=
 शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा शहरात भगवान परशुराम जयंती अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाली 
   प्रसंगी अध्यक्षस्थानी शिंदखेडा ब्राह्मण सभेचे अध्यक्ष प्रदीप दीक्षित उपस्थित होते तर प्रमुख वक्ते म्हणून सतीश मुळे चारुशीला दीक्षित श्रीराम बालाजी मंदिर मठाधिपती मेघश्याम बुवा यासह शिंदखेडा ब्राह्मण सभेचे उपाध्यक्ष अनिल जोशी उर्फ गजू यांची विशेष उपस्थिती होती 
   प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाला ब्राह्मण समाजातील स्त्री पुरुष सहकुटुंब सहपरिवार उपस्थित होते 
    प्रसंगी सतीश मुळे यांनी भगवान परशुरामाच्या जन्माविषयी कर्तव्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले तर सौ चारुशीला दीक्षित यांनीही परशुरामाचा जन्म परशुरामाने केलेल्या कार्याचा संदर्भ तसेच ऐतिहासिक महत्त्व प्रसंगी उपस्थितितांसमोर मांडले सौ मनीषा नाईक यासह जोशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले 
   अध्यक्षीय मनोगतात कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप दीक्षित म्हणाले परशुराम हा आज्ञाधारक तसेच जरी संतापी होता तरीही काही क्षणात तो केलेल्या आज्ञेचे पालन करीत होता परशुराम हा विष्णूचा सहावा अवतार मानला जातो शस्त्र चालवणे त्यातील ज्ञान करणे यासंदर्भामध्ये अग्रेसर होते भगवान परशुराम यांनी पुराणकथेमध्ये आपले स्थान प्रस्थापित केलेले आहे भारतीय संस्कृती ही संस्काराने नटलेली संस्कृती आहे प्रत्येक ब्राह्मण कुटुंबातील सदस्यांनी आपल्या घरी भगवान परशुरामांची प्रतिमा लावून त्याचे पूजन करणे महत्त्वाचे आहे 
     कार्यक्रम प्रसंगी श्रीराम बालाजी मंदिर संस्थानचे मठाधिपती मेघशाम महाराज यांनी संत ज्ञानेश्वरांच्या बाबतीत असलेले संस्कार विचार समाजापुढे मांडले . समाजातील प्रत्येक कुटुंबातील मुलांनी ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत त्याचं शिक्षण घेणे गरजेचे आहे असेही भावनिक आवाहन केले 
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक जोशी यांनी केले तर कार्यक्रमाची नियोजन ब्राह्मण सभेचे सचिव विवेक नाईक भरत थेटे चेतन कुलकर्णी यांनी केले भगवान परशुराम जयंतीचा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला याबाबत समाजातील उपस्थित त्यांनी समाधान व्यक्त केले शेवटी आभार प्रदर्शन व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली

Post a Comment

0 Comments