Header Ads Widget

*दोंडाईचा- शिंदखेडा तालुका खरेदी-विक्री संघाच्या सभापतीपदी माधुरी सिसोदे तर उपसभापतीपदी साहेबराव गोसावी*। ना. रावलांच्या नेतृत्वात प्रथमच महिला सभापती


दोंडाईचा:- शिंदखेडा तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणूक गतवर्षीच राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री ना.जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली. आज सभापती व उपसभापती पदासाठी
 निवडणूक घेण्यात आली. यात नरडाणा येथील भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाउपाध्यक्षा माधुरी मधुकरu सिसोदे यांची सभापतीपदी तर मेथी येथील माजी पं.स.सदस्य साहेबराव गोसावी यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
    शिंदखेडा तालुका खरेदी-विक्री संघाची स्थापना सन 1957 मध्ये झाली असून यात माधुरी सिसोदे या प्रथमच महिला सभापती म्हणून निवडून आल्या आहेत. 
   यावेळी दोंडाईचा शाखा प्रभारीपदी सुराय येथील गुलाब पाटील, शिंदखेडा शाखा प्रभारीपदी विरदेल सरपंच सुवर्णा बेहेरे, नरडाणा शाखा प्रभारीपदी शामसिंग गिरासे यांची निवड करण्यात आली. 
   यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष महाविरसिंह रावल, माजी सभापती रघुवीर बागल, माजी सभापती जिजाबराव सोनवणे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डि.एस.गिरासे, संचालक राजेंद्र बागुल, भुपेंद्र निकम, श्रावण आहिरे, भालेराव बेहेरे, उमेश गिरासे, प्रमोद पवार, प्रविण पाटील, गुणवंत सुर्यवंशी, सुनिल पाटील, भिमसिंग गिरासे, शंकर जाधव, राजेंद्र पाटिल, महेंद्र खैरनार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments