Header Ads Widget

* डोंगरगाव परिसरात वादळी वाऱ्याने पावसाने झोडपले शेती पिकांचे अतोनात नुकसान. *

                           
==≠===============================
 डोंगरगाव ( प्रतिनिधी )आर आर पाटील== दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी डोंगरगाव सह परिसरास वादळी पावसाने संपूर्ण परिसरास झोडपून काढले या परिसरात सध्या शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे शेतात परिपक्व असलेल्या पिकात. 
मका ,गहू,ज्वारी ,बाजरी ,उन्हाळी ,कांदा ,भाजीपाला ,फळबागा इत्यादी विविध परी पक्व पिकांचा समावेश आहे  परंतु आजच्या या  जोरदार वादळी पावसाने गुरांचा चारा निकृष्ट केला असून वरील पिकांची नासाडी  प्रतवारी  खराब झालेली आहे  या बे मोसमी थंड पावसामुळे परिपक्व रांगडा  कांद्यामध्ये थंड पाणी गेल्यामुळे हा कांदा लवकर सडतो  म्हणून शेतकऱ्यांचे एकूणच मोठे नुकसान आहे शासनाने तातडीने परिसरातील शेतांमध्ये पंचनामे करून शेतकऱ्यांना शेती पिकांच्या नुकसानीची भरपाई द्यावी ही असंख्य शेतकरी वर्गांने मागणी केलेली आहे

Post a Comment

0 Comments