=================================
डोंगरगाव (प्रतिनिधी) आर आर पाटील == दि, 31 मार्च 2026 रोजी डोंगरगाव येथील रहिवासी शेतकरी मात्र तामसवाडी तालुका धुळे या शिवारात शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या एकाच रात्री लाखो रुपयांची 18 ते 50 शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटर व केबलची चोरी झालेली आहे हा भाग सोनगीर पोलीस स्टेशन अंतर्गत असल्याने काही शेतकऱ्यांनी सोनगीर पोलीस स्टेशनला दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी तक्रारी दिलेल्या आहेत डोंगरगाव नरडाणा पोलीस स्टेशन अंतर्गत येते या गावाजवळच महाराष्ट्र शासनाचा सोंनवद धरण हा एक मोठा प्रकल्प आहे सध्या धरणात मुबलक पाणीसाठा आहे या धरणावर शासनाची विविध यंत्रसामुग्री आहे येथे सुद्धा चोऱ्या होऊच शकतात वरील चोरी संदर्भात दिवसा अथवा रात्रीतून एकदाही पोलिसांची गाडी चौकशीसाठी दिसून आलेले नाही सध्या दैनंदिन या परिसरात मोठ्या ,छोट्या ,भुरट्या चोऱ्या ह्या सुरूच आहेत परंतु पोलीस यंत्रणेचे पूर्णतः दुर्लक्ष दिसून येत आहे असे जनतेचे म्हणणे आहे म्हणून संबंधित पोलीस स्टेशन ने या परिसरात रात्रीची गस्ती सुरू करून लोकांमधील भीती दूर करावी व चोरांचा बंदोबस्त करावा अशी बहुसंख्य जनतेची मागणी या परिसरातून जोर धरू लागलेली आहे स्वतः धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणाकडे लक्ष घालावे अशी ही जनतेतून मागणी होत आहे
0 Comments