शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-
शिंदखेडा तालुक्यातील तालखेडा प्र. न. येथे युवा क्रिकेट मंडळ आयोजित तावखेडा प्रीमियर लीग अर्थात टी पी एल उन्हाळी खुल्या क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धेचे आज शानदार उद्घाटन करण्यात आले. सदर स्पर्धेला एकूण 40 संघ सहभागी झाले आहेत सदर स्पर्धा दहा दिवस चालणार असून गाव व परिसरातील ग्रामस्थ युवकांसाठी एक प्रकारे आनंद उत्सव, प्रेरणादायी ठरणार आहे.
सदर स्पर्धेचे उद्घाटन सोनू जयसिंग गिरासे रोजगार सेवक ग्रामपंचायत तावखेडा व रंजीत गांगजी गिरासे माजी कप्तान तावखेडा यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वाल्मीक ऋषी विद्यालय तावखेडा मुख्याध्यापिका प्रतिभा वाघ, मंत्री जयकुमार रावल यांचे स्वीह सहाय्यक वाय जी गिरासे, शिक्षक कुंदन पाटील, एस एन पाटील,श्रीकांत केसे, नितीन पाटील यांसह गावातील ज्येष्ठ नागरिक व आयोजक रणजीतसिंग गांगजी गिरासे, प्रेमसिंग चंद्रसिंग गिरासे, महेंद्र भीमसिंह गिरासे, योगेंद्रसिंग गोविंदसिंग गिरासे सर, विष्णू किसन ईशी,सोनू जयसिंग राजपूत, भरतसिंग मोहनसिंग गिरासे, महेंद्रसिंग निंबा गिरासे, दीपक जंगू ठाकरे, प्रेमसिंग भवानसिंग गिरासे, जवान सिंग रणसिंग गिरासे, दादाभाई बारका पेंढारकर,दीपक धोंडू गिरासे आदी उपस्थित होते.यावेळी दानशूर व्यक्तींचा साल, श्रीफळ गुलाबपुष्प देऊन आयोजकांनी सत्कार केला स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 41 हजार असून त्यात कै. गणपत सिंग हंबरसिंग गिरासे यांच्या स्मरणार्थ संदीप गणपतसिंग गिरासे यांच्याकडून 21हजार रुपये कै. जयसिंग नारायणसिंग राजपूत फौजी यांच्या स्मरणार्थ सोनू जयसिंग राजपूत यांच्याकडून 11हजार 111रुपये कै. गांगजी डोंगरसिंग गिरासे यांच्या स्मरणार्थ राकेश नानाभाऊ गिरासे यांच्याकडून 11हजार रुपये असे विभागून तर द्वितीय पारितोषिक 21000 चे असून त्यात जितू मामा राजपूत सरपंच तथा अध्यक्ष स्वप्नपूर्ती प्रतिष्ठान लंघाणे यांच्याकडून 11हजार रुपये,हरपारसिंग भोजूसिंग राजपूत जेसीबी वणी यांच्याकडून पाच हजार 100 रुपये,वाल्मीक रुषी विद्यालय तावखेडा यांच्याकडून पाच हजार एक रुपये असे विभागून दोन बक्षिसे ठेवण्यात आली आहेत यांसह इतर वैयक्तिक बक्षिसे देखील ठेवण्यात आली आहेत. सदर स्पर्धेसाठी समालोचक कॉमेट्री भाऊसाहेब विजय शिंदे गुलाबसिंग मानसिंग गिरासे जवानसिंग धनसिंग गिरासे दीपक धोंडूसिंग गिरासे विष्णू किसन ईशी,जितेंद्र सिंग जयसिंग गिरासे, नवलसिंग धनसिंग राउळ, महेंद्रसिंग निंबा गिरासे हे करणार आहेत सदर स्पर्धा टेनिस बॉल ने खेळवली जात आहे तीन षटकांचा सर्कल असून दहा षटकांचा सामना तर फायनल सामना 12 षटकांचा असेल पहिला उदघाटिय सामना बामणे विरुद्ध भादवड यांच्यात झाला तावखेडा गावातील ग्रामस्थ व परिसरातील ग्रामस्थ व युवकांनी सदर स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटावा असे आयोजकांच्या वतीने यावेळी करण्यात आले याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून ग्रामीण भागात अशा स्पर्धा भरवणे युवकांसाठी प्रेरणादायी ठरणार असून भविष्यात त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळून त्यांचे भविष्य उज्वल होऊ शकते असे यावेळी सांगितले.
0 Comments