---
नरडाणा---प्राथमिक आरोग्य केंद्र नरडाणा येथे “१०० दिवसांत टीबी मुक्त भारत अभियान” अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास माननीय माजी सभापती संजीवनी ताई शिषोदे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात सुरुवात झाली.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आसिफ कच्ची, टी बी निर्मूलन चे जिल्हा तालुका अधिकारी, डॉ. मनोज राजपूत तसेच इतर सर्व आरोग्य कर्मचारी व आशा सेविका, रुग्ण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान टीबी रोगाबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच टीबी निर्मूलनासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत एकूण ११० एक्सप्रेस लाभार्थी रुग्णांची तपासणी व नोंदणी करण्यात आली.
तसेच या कार्यक्रमासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिनजी बोडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रुचिरा पवार तसेच डॉ सोनिया बागडे मॅडम डिस्ट्रिक्ट TB ऑफिसर यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व कर्मचारीवर्गाने विशेष परिश्रम घेतले.
0 Comments