Header Ads Widget

दसवेल येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

दसवेल येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त महामानवास अभिवादन करण्यात आले जनहित सामाजिक बहुउद्देशीय संस्था दसवेल तालुका शिंदखेडा यांच्यावतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली संस्थेचे अध्यक्ष अनिल पिंपळीसकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण भारतीय राज्यघटना लिहून प्रत्येक भारतीय नागरिकाला तळागाळातल्या घटकाला संविधान व घटनेमार्फत फार मोठ्या न्याय देण्याचे काम केले आहे शिका संघटित व्हा व संघर्ष करा असे बाबासाहेबांनी ही वाक्य प्रेरित करून सर्वांना एक फार मोठा संदेश देण्यात आला दलित पद्धतीत आदिवासी ओबीसी सर्व घटकांसाठी बाबासाहेबांनी फार मोठे काम केले आहे महिला सक्षमीकरण असो शेतकरी सोबत गरीब असो कष्टकरी असो दिन दलित असो आदिवासी असो नोकरदार असो सर्व घटकांसाठी बाबासाहेबांनी फार मोठे काम ही राज्यघटनेच्या माध्यमातून केले आहे बाबासाहेबांची विचार आचार प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे असे मी समजतो व बाबासाहेबांना एक मोठा आदर्श ठेवून समाजापुढे ऊर्जा निर्माण करण्याचे काम आपण केले पाहिजे असे त्यांनी आपले मनोगत मध्ये व्यक्त केली याप्रसंगी गावातील सरपंच उपसरपंच सदस्य विकास सोसायटी सदस्य चेअरमन तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण मित्रवर्ग फार मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनेश पाटील चतुर पाटील विजय पाटील हिरामण पाटील विनायक बच्छाव प्रकाश बच्छाव गणेश मोरे देविदास सेमी मनोज मोरे राकेश पाटील ज्ञानेश्वर पवार रवींद्र महाले राहुल पाटील रमेश पाटील किशोर पाटील गणेश पिंपळीस्कर मोतीराम पिंपळीस्कर गावातील संख्या गावकरी उपस्थित होते सर्वांनी बाबासाहेबांना फुल आहार व मेणबत्ती प्रचलित करून बाबासाहेबांना अभिवादन केले

Post a Comment

0 Comments