सुजान नागरिक सा प्रतिनिधी श्री.सी.जी.वारूडे
शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयास नुकतेच शिंदखेडा तालुक्यातील नामदार आमदार भाऊसो.जयकुमारजी रावल यांच्या स्थानिक निधीमधून विद्यालयास "संगणक व प्रिंटर" संच मिळाल्याने आनंद उत्साह!...
सविस्तर असे की, माता तुळजाभवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित, अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी या विद्यालयास धुळे जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री व पणन,राजशिष्टाचार मंत्री महाराष्ट्र राज्य- माननीय आमदार भाऊसो.श्री.जयकुमारजी यांच्या "स्थानिक विकास निधी" कार्यक्रम अंतर्गत "संगणक व प्रिंटर "संच वाटप कार्यक्रम प्रसंगी मा.आमदार मंत्री महोदय आदरणीय भाऊसो.श्री जयकुमारजी रावल यांच्या हस्ते संगणक व प्रिंटर संच स्विकारताना संस्थापक अध्यक्ष आबासाहेब श्री जे.बी पाटील व विद्यालयाचे प्रेरणास्रोत मार्गदर्शक मुख्याध्यापक आदरणीय आबासाहेब श्री.एस. ए.कदम सर...
स्थानिक निधी कार्यक्रम प्रसंगी विद्यालयात संगणक व प्रिंटर संच मिळाल्याबद्दल मा.मुख्याध्यापक श्री एस.ए.कदम सर यांनी प्रथमत: आदरणीय आमदार भाऊसो.जयकुमारजी रावल यांचे आभार व्यक्त करतांना म्हणाले की,माननीय पाणीदार आमदार जयकुमारजी रावल यांच्या "स्वप्नपूर्ती" या भावनेतून ग्रामीण भागातील शाळांना जर संगणक व प्रिंटर दिले गेले तर यातून ऑनलाईन,ईमेल च्यामाध्यमातून सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक, धार्मिक व प्रशासकीय माहिती मिळेल व सर्वांगीण विकासात मोठे सकारात्मक बदल होतील
या दृष्टिकोनातून त्यांच्या स्थानिक विकास निधीमधून विद्यालयास "संगणक व प्रिंटर संच " मिळाल्याने विद्यार्थी-पालक-शिक्षक, मुख्याध्यापक व संस्थापक अध्यक्ष या सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.व
" संगणक व प्रिंटर संच "मिळाल्याबद्दल मा.आमदार आदरणीय श्री भाऊसो.जयकुमारजी रावल साहेब यांचे संस्थेच्यावतीने संस्थापक अध्यक्ष आदरणीय आबासाहेब श्री.जे.बी.पाटील व मा.प्रेरणास्रोत मुख्याध्यापक श्री.एस.ए.कदम सर व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू -भगिनी या सर्वांमार्फत मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
🌹🌹💐💐💐🌹🌹🙏🙏
0 Comments