Header Ads Widget

*श्री नरेंद्र अहिरे यांची कृतिशील निवृत्त अधिकारी व कर्मचारी संस्था सिंदखेडा तालुका समन्वयक पदी नियुक्ती*

( धुळे) कृतिशील निवृत्त अधिकारी व कर्मचारी संस्था धुळे च्या सर्वसाधारण सभेत वार्षिक मेळाव्यात संस्थेच्या सिंदखेडा तालुका शाखेच्या समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री नरेंद्र राजाराम अहिरे ( मोबाईल - 9403849802)  हे  आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त, सेवा निवृत्त प्राचार्य, माजी अध्यक्ष - माध्यमिक शिक्षक संघ, धुळे - नंदुरबार, माजी विभागीय चेअरमन - धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँक लि.धुळे तसेच सध्या विद्यमान चेअरमन - दि. सिंदखेडा जनता पिपल्स पतसंस्था लि. सिंदखेडा 
त्यांनी भारत स्काऊट व गाईड धुळे संस्थेचे सहायक जिल्हा आयुक्त पदाची जबाबदारी सक्षमतेने सांभाळली आहे.
अध्यक्ष - अ भा साने गुरूजी कथामाला धुळे 
माजी उपाध्यक्ष - शिक्षक लोकशाही आघाडी, धुळे 
त्यांचे मराठा बोर्डिंग धुळे येथे माध्यमिक शिक्षण घेत असताना ९०० विद्यार्थी चें नेतृत्व जनरल सेक्रेटरी काम केले आहे तसेच पाडवी नुतन विद्यालय, धुळे येथे इयत्ता ५ ते १० पर्यंत सलग माॅनीटर ची भुमिका पार पाडली आहे 
त्यांच्या संघटनात्मक व सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल त्यांची प्रभारी सिंदखेडा तालुका समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या नियुक्तीमुळे निश्चितच संस्थेचे कार्य भरीव कामगिरी साठी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत व अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत 
डॉ संजय पाटील 
अध्यक्ष 
श्री अविनाश मोरे 
सचिव 
कृतिशील निवृत्त अधिकारी व कर्मचारी संस्था धुळे

Post a Comment

0 Comments