================================
डोंगरगाव (प्रतिनिधी )आर आर पाटील == काल दि ,2 एप्रिल 2026 रोजी" सुजान नागरिक "या वृत्तपत्रात "डोंगरगाव परिसरात धाडसी चोरीचे सत्र सुरू नरडाणा सोनगीर पोलिसांची बघ्याची भूमिका रात्रीची गस्त सुरू करावी जनतेची मागणी" अशा आशयाचे वृत्त प्रकाशित झाले त्याची दखल म्हणून त्याच दिवशी रात्री पोलीस गाडीचा सायरन गावकऱ्यांच्या कानावर आला आणि थोडाफार का असेना केबल इलेक्ट्रिक मोटारी चोरी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला परंतु लाखो रुपयांचे इलेक्ट्रिक साहित्याची सुमारे 50 शेतकऱ्यांची चोरी झालेली आहे तिचा कसून तातडीने सुराग लावून शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी आता सर्व दूर होत आहे आणि तेच मोठे आव्हान पोलीस यंत्रणे समोर उभे आहे
0 Comments