बळसाणे (ता.साक्री)- नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस गारपीट वादळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे पारदर्शक अचूक पद्धतीने तात्काळ पुर्ण करण्यात येतील. महाराष्ट्र शासन पुर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे ठोस आश्वासन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री ना. जयकुमार भाऊ रावल यांनी नुकतेच बळसाणे गावी जावून शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले.
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला म्हणून बळसाणे ग्रामपंचायत, वि.का.से.स. सोसायटी बळसाणेसह परिसरातील गावांतील ग्रामस्थ यांनी एका निवेदनाद्वारे भेट देण्यासाठी केलेल्या आवाहनास ना. जयकुमार रावल यांनी तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पहाणी करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याबाबत आश्वासित केले व संबंधित अधिकाऱ्यांना त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश दिले. या भेटी प्रसंगी प्रांत साहेब कुवर, तहसिलदार सोनवणे, बीडीओ, कृषि अधिकारी देसले, मार्केट कमिटीचे चेअरमन नारायण भाऊसाहेब, चुडामण भाऊसाहेब, इंदवे येथील सरपंच निलेश देवरे, इंधवे येथील माजी सरपंच दिनकर आबा पाटील, सरदार पाटील आदी मान्यवरांसह बळसाणे व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. निवेदनाची दखल घेऊन तातडीने भेट देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आश्वासित केल्याबद्दल बळसाणे येथील सरपंच ज्ञानेश्वर हालोर, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन कैलास चव्हाण सह परिसरातील ग्रामस्थांनी मंत्री महोदयांचे आभार मानले.
0 Comments