Header Ads Widget

आमदार निधीतून बेटावद विद्यालयास संगणक व प्रिंटरची भेट; जयकुमार रावल यांचे आभार

बेटावद  – बेटावद एज्युकेशन सोसायटी संचलित प्रियदर्शिनी इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बेटावद येथे शालेय कामकाज अधिक सुसज्ज करण्यासाठी माननीय नामदार जयकुमारभाऊ रावल (कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या स्थानिक आमदार निधीतून संगणक व प्रिंटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळणार असून शैक्षणिक गुणवत्तेतही भर पडणार आहे. संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, मुख्याध्यापक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी या उपक्रमाबद्दल माननीय जयकुमारभाऊ रावल यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाच्या दिशेने नवे बळ मिळाले असून, शाळेच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments