Header Ads Widget

_*गुरु हे शिष्यांचे जीवन समृद्ध करतात*_ -प्राचार्य डॉ.एम.एस. उभाळे

*दोंडाईचा (प्रतिनिधी)-* प्रभाकर आडगाळे. "आपल्या आयुष्याला वळण देणारे सर्व आपले गुरुच असतात. सर्व गुरुजनांकडून शिष्य हे ज्ञानाबरोबरच काही कौशल्यही शिकत असतात. गुरु शिष्यांना आपल्या वर्तनातून आदर्श निर्माण करत असतात. त्याचप्रमाणे त्यांच्यावर कायमस्वरूपी संस्कार करीत असतात. गुरु हे शिष्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक करतात. गुरु शिष्यांना जीवन जगण्यासाठी सक्षम बनवत असतात. त्यामुळे गुरु हे शिष्यांचे जीवन समृद्ध करीत असतात."  असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.एम.एस.उभाळे यांनी केले. दोंडाईचा येथील श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल बी.एड. महाविद्यालयात आयोजित गुरुपौर्णिमा कार्यक्रमात त्यांनी आपले विचार मांडले.
     सर्वप्रथम प्रा. रेवती बागुल यांनी कार्यक्रमाचा हेतू व रूपरेषा प्रास्ताविकातून सादर केली. कार्यक्रमाचे अतिथी प्राचार्य डॉ.पी.झेड. झांबरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मूर्ती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. सर्व उपस्थितांनी विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेवर तयार केलेल्या भितीपत्रिकेचे प्रकाशन केले. मान्यवरांच्या स्वागतानंतर विद्यार्थ्यांची मनोगत झाली. चेतना दातेराव, उमा पाटील, जयश्री ठाकूर,मोहिनी सोनार, अजय पवार, प्रियंका पाटील यांनी समयोचित मनोगते सादर केली. तर गणेश पारखे यांनी गुरुपौर्णिमा प्रतिज्ञा सर्वांकडून वदवून घेतली. प्रा.अमृता चव्हाण यांनी जीवनातील भावनांचे महत्त्व अधोरेखित केले तर प्रा. एस.एम. ठाकरे यांनी जीवनातील गुरूंचे महत्त्व विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केले. प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ.पी.झेड.झांबरे यांनी भारतातील गुरु व शिष्यांची महान परंपरा सांगितली. प्राचार्य डॉ.एम एस उभाळे यांनी गुरु व शिष्य यातील अनिष्ट संबंध अध्यक्षीय मनोगतातून सांगितले. प्राध्यापकांना सर्व विद्यार्थ्यांनी विठ्ठल- रखुमाईच्या मूर्ती भेट दिल्या. नेहा राजपूत यांनी सूत्रसंचालन तर दीपमला भामरे यांनी आभार व्यक्त केले.
       कार्यक्रमाच्या नियोजनाचे मार्गदर्शन प्रा. पी.डी. बोरसे व प्रा. एस. एम.ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन प्रा. रेवती बागुल व प्रा. अमृता चव्हाण यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.आर.पी पाटील,प्रा.डॉ. योगिता चौधरी,प्रा. पी. एल. खाचणे, प्रा. बी. टी. शेजाळ, प्रा. मंजुषा बावने व प्रा. निशा ठाकूर यांनी प्रयत्न केले. तर शिक्षकेतर कर्मचारी कृष्णा बागुल, शंकर गिरासे, अमर राजपूत, जयेश धनगर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी वर्षातील विद्यार्थी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments