Header Ads Widget

कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात नुकताच पार पडलेला गेट-टुगेदर कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न

सुजाण नागरिक सा.प्रतिनिधी श्री.सी.जी.वारुडे 
          शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात नुकताच पार पडलेला गेट-टुगेदर(स्नेहसंमेलन/पूर्व विद्यार्थी मेळावा) कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
           सविस्तर वृत्त असे की,माता तुळजाभवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित, अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी या विद्यालयात सन २०११-२०१२ या माजी विद्यार्थ्यांनी गेटू-टुगेदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या गेट पासून ते मंडपापर्यंत सर्व गुरुवर्य व कर्मचारी बंधू -भगिनींचे  ढोल ताश्याच्या संगीतमय व फटाक्यांच्या आवाजाने स्वागत करण्यात आले.
         तद्नंतर या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे आदरणीय प्रेरणास्रोत मुख्याध्यापक आबासाहेब श्री.एस.ए.कदम सर व प्रमुख पाहुणे- संस्थेचे संस्थापक प्रेरणास्थान अध्यक्ष आदरणीय आबासाहेब श्री.जे.बी.पाटील,स्थानिक शालेय शिक्षण समितीचे चेअरमन- नानासाहेब श्री.पी.जे.पाटील, संस्थेच्या संचालिका श्रीमती बी.जे.कदम मॅडम व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू -भगिनी या सर्वांच्या समवेत दीपप्रज्वलन आणि  शाळेच्या प्रार्थना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली...  व नंतर  दिवंगत शिक्षक कै.कालिदास शालिग्राम सनेर सर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
       त्यांनतर माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मंचावर उपस्थित असलेले मान्यवर व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांचे पुष्पगुच्छ श्रीफळ व सन्मानचिन्ह भेट देऊन सत्कार करण्यात आला.
         त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी १४वर्षानंतर गुरुवर्य भेट प्रसंगी आपापली मनोगत व्यक्त करतांना माजी विद्यार्थी- सौ.अनिता पाटील,सौ.अलक भामरे,सौ.दिपाली दिवाणजी,सौ.रेखा पाटील,सौ.कविता पाटील,सौ.मोनिका पाटील,सौ.मोनाली पाटील, संगीता पाटील व श्री संदीप पाटील,श्री समाधान पाटील,श्री ललित कदम,श्री शिवम झालसे श्री धनंजय झालसे,श्री रामकृष्ण पाटील,श्री रावसाहेब पाटील,श्री धनराज पवार,श्री प्रमोद झालसे,रवींद्र जाधव आदिंनी मनोगत व्यक्त केलेत व "छडी लागे छम छम विद्या येई घम घम" व लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या उक्तीप्रमाणे "एक दिवसाची शाळा शिकूया पुन्हा लहान होऊया" ! अशा कित्येक तरी जुन्या आठवणींना उजाळा देत अनेकांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले.. 
                नंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या
       तद्नंतर शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्रेरणास्रोत मुख्याध्यापक आदरणीय आबासाहेब श्री एस.ए.कदम सर यांनी 'जीवन एक संघर्ष'आहे, विद्यार्थी मित्रांनो जीवनात अनेक अडीअडचणी येतात परंतु टेन्शन घ्यायचचं नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं... काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही.. कारण नशीब,कर्म,संधी कधीही बदलू शकते.. म्हणून जीवन जगताना अगदी आनंदात पण शिस्तबद्ध पद्धतीने जगा.. परंतु जीवनात तुम्ही कितीही मोठे झालात तरी नम्र राहा-झाडाला जितकी जास्त फळे लागतात तितकं ते खाली झुलतं.माणसाचंही तसंच असतं जितका मोठा तितका नम्र. म्हणून.. आई-वडील,काका-काकू,बहिण-भाऊ, आप्तेष्ट -नातेवाईक मित्र -परिवार व गुरुवर्य यांना विसरून नका.. व एकमेकांच्या प्रत्येकांच्या सुख-दुखात स्वामील व्हावे व प्रत्येकाशी मनापासून वागा - "चांगली वागणूक कधीच वाया जात नाही लोक कसे ही वागले...तरी आपली माणुसकी कधी सोडू नका"...कारण हा जन्म पुन्हा नाही!साने गुरुजी म्हणतात - खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे!(माणूसकी धर्म).
     स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवा.-"लोकांची मतं तर रोज बदलतात...पण स्वतःवरचा विश्वास आपले आयुष्य बदलून टाकतो"... व स्वतःवर प्रेम करा.-"स्वतःशी तसंच बोला.. जसं तुम्ही तुमच्या आवडत्या माणसाशी बोलता.स्वत:ला माफ करायला शिका...आणि स्वतःची व परिवाराची काळजी घ्या"... इ.विषयी मार्गदर्शन करण्यात आले. 
      तद्नंतर माजी विद्यार्थी -विद्यार्थीनींच्या हस्ते विद्यालयासाठी योगदान "महात्मा जोतीराव फुले" यांची "पुतळा प्रतिमा" मंचावर उपस्थित असलेले मान्यवर मुख्याध्यापक आबासाहेब श्री.एस.ए.कदम सर,संचालक मंडळ व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू -भगिनी समवेत विद्यालयास भेट प्रतिमा देण्यात आली.
            शेवटी माजी विद्यार्थ्यांनी एक दिवसाची शाळेत खो-खो, कबड्डी,धावणे,गोळा फेक,भालाफेक व थाळी फेक इ.खेळाचा आनंद घेऊन संगितावर डान्स, लेझीम व नृत्य सादरीकरण झाल्यानंतर जुन्या आठवणींवर आधारित मनमोकळ्या गप्पा करत सामुहिक भोजनाचे आस्वाद घेतला व यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन - अहिराणी कलाकार श्री.नागेश हिंमत पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन - श्री ललित रमेश कदम यांनी मानले व या सुंदर व संस्मरणीय सोहळा यशस्वीतेसाठी सन २०११-२०१२ या सर्व माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले व  कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments