Header Ads Widget

शिंदखेडा येथील ऐतिहासिक लाकडी दरवाजाला ‘गणेश दरवाजा’ नामकरणाची बांधकाम कामगार सेनेची मागणी

 शिंदखेडा प्रतिनिधी 
शिंदखेडा शहरातील बुराई नदी काठ परिसरातील ऐतिहासिक लाकडी दरवाजास ‘गणेश दरवाजा’ असे अधिकृत नामकरण करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या वतीने शिंदखेडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्या नावे निवेदन देण्यात आले. सदर निवेदन प्रशासकीय अधिकारी
 सचिन वाघ यांनी स्वीकारले.या ऐतिहासिक दरवाजावर
 श्री गणेशाच्या प्रतिमेचे कोरीव काम स्पष्टपणे आढळून येत असल्याने तसेच ‘पीर दरवाजा’ या उल्लेखाला अधिकृत ऐतिहासिक आधार उपलब्ध नसल्याचे नगरपंचायतीकडून सांगण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ‘गणेश दरवाजा’ असे नामकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.निवेदनात नगरपंचायतीच्या अधिकृत नोंदी, कागदपत्रे, नकाशे व अभिलेखांमध्ये ‘गणेश दरवाजा’ अशी नोंद करण्यात यावी, दरवाजावर अधिकृत नामफलक लावण्यात यावा तसेच या ऐतिहासिक वास्तूचे जतन, संवर्धन, सुशोभीकरण व रंगरंगोटी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.‘पीर दरवाजा’ उल्लेखाबाबत अधिकृत आधार द्यावा अथवा ‘गणेश दरवाजा’ नामकरण करावे, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली. ही मागणी कोणत्याही व्यक्ती किंवा समाजाच्या विरोधात नसून शिंदखेडा शहराचा ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक ओळख आणि उपलब्ध पुरावे यांच्या आधारे करण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.यावेळी शिवसेना शिंदखेडा तालुका उपप्रमुख भालचंद्र पाटील, उपजिल्हाप्रमुख विठ्ठल पाटील, शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे तालुकाप्रमुख भूषण पवार, संघटक मुरलीधर महाजन, नाना चौधरी, बालीभाऊ सोनार, सतीश सूर्यवंशी, अमोल वाघ, रवी राजपुरोहित, शोभाताई पाटील,सुनील सूर्यवंशी यांच्यासह हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.आता या मागणीवर शिंदखेडा नगरपंचायत प्रशासन काय निर्णय घेते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments