दसवेल : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जनहित सामाजिक बहुउद्देशीय संस्था, दसवेल यांच्या वतीने जिल्हा परिषद मराठी शाळा, दसवेल येथील इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना पावसाळी छत्र्यांचे वाटप करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल पिंपळीसकर यांच्या पुढाकाराने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
जनहित सामाजिक बहुउद्देशीय संस्था दसवेल ही सातत्याने समाजोपयोगी व सामाजिक उपक्रम राबवत असून, त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल पिंपळीसकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “जनहित संस्था यापुढेही गावासाठी तसेच संपूर्ण समाजासाठी सामाजिक कार्याच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत राहील. गावातील तरुण, युवक व विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी आणि गावाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे. सर्वांना मदत करणे हे संस्थेचे प्रथम ध्येय आहे.”
या कार्यक्रमास गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक, तरुण मित्र, विद्यार्थी तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या वतीने उपस्थितांचे मनापासून आभार मानण्यात आले.
0 Comments