अमळनेर- राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या मुलीचा आंतरजातीय विवाह केला. सती प्रथेला विरोध केला, मुलाच्या लग्नात हुंडा घेतला नाही व मुलीच्या लग्नात हुंडा दिला नाही. मुस्लिम समाजाच्या मशिदीला मदत केली, बालविवाह प्रथा बंद केली, देशभरातील लाखो शेतकऱ्यांना, गरिबांना, वंचितांना आपल्या स्वतःच्या पैशातून मदत व सहकार्य केले. हा गुण अहिल्यादेवींचा घेऊन आपण अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने गरीब विद्यार्थ्यांना अमळनेर मध्ये मदत करावी असे आवाहन ॲड. तिलोत्तमा पाटील यांनी केले. लोकमाता अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त युवा कल्याण प्रतिष्ठानने (अमळनेर) कार्यक्रमा चे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी प्रा अशोक पवार होते. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांसाठी महेश्वर सहल आयोजनाचा निर्णय मौर्य क्रांती संघाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बन्सीलाल भागवत सर यांनी जाहीर केला. आणि अहिल्याबाई होळकर यांचा जीवनपट सविस्तर आपल्या भाषणातून मांडला. याप्रसंगी कमल अक्का, अशोक पाटील, रियाज मौलाना, ॲड. रज्जाक शेख, डी एम पाटील,शरद धनगर आदींची भाषणे झाली . डी ए पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन एस सी तेले सर यांनी केले. कार्यक्रमाला अशोक बिऱ्हाडे, बापूराव ठाकरे, भास्करराव बोरसे,संजय पाटील,चिंधू वानखेडे, बापू सांगोरे सर, सईद तेली, मनोज मोरे, दिलीप खांडेकर, बी.एल.सैंदाणे, गोविंदा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
*******
0 Comments