Header Ads Widget

‘दशक’ चे ‘दीड दशक’ ‌‌ मिळे जीवदान नक्की हिच दशकची ख्याती,सेवा पिढी दर पिढी तीनं जोडलीय नाती.


धुळे - येथील अशोकनगर लेनिन चौकाजवळील 'दशक ' हॉस्पिटलने स्वातंत्र्य दिनी दिड दशकाकडे आगेकूच केली . स्वातंत्र्य सैनिक म्हणून सर्व सुविधा नाकारणारे स्वातंत्र्य सैनिक साथी दशरथ तात्या पाटील व कमलताई पाटील यांचे नातू , प्रा शाम पाटील व निलीमा पाटील यांचे सुपुत्र आदर्श गाव मोराणे येथील भूमिपुत्र डॉ सलील पाटील व डॉ नेहा पाटील यांच्या दशक हॉस्पिटलचे उद्‌घाटन राष्ट्रीय जनआंदोलनाच्या नेत्या मेधाताई पाटकर यांच्या शुभ हस्ते झाले होते.  दिड दशकात या दांपत्याने आपल्या हस्त कौशल्याने उतुंग झेप घेत रुग्णांचा विश्वास संपादन केला . केवळ उत्तर महाराष्ट्रच नव्हे तर शेजारच्या मध्यप्रदेश गुजराथ राज्यांतील रुग्णांची उपचारासाठी येथे वर्दळ असते, रुग्णांना त्यांचे मार्गदर्शन आणि रुग्णांशी बोलण्याची त्यांची हातोटी यामुळे गलितगात्र रुग्ण अर्धा बरा होतो , असा अनुभव अनेकांनी घेतला आहे. अश्रु ढाळीत दशक मध्ये प्रवेश करणारा रुग्ण डिस्चार्ज घेतांना हसऱ्या मुद्रेने बाहेर पडतो अशी दशकची ख्याती आहे. कोरोना काळात भयभित झालेल्या अनेक रुग्णांना त्यांनी मृत्युच्या दाढेतून बाहेर काढल्याचे सर्व श्रृत आहे . आदर्श जनसेवेचा वारसा असलेल्या डॉ सलील पाटील, डॉ. नेहा पाटील यांचे  दिड दशकाच्या यशस्वी वाटचालीबद्दल ज्येष्ठ पत्रकार गो.पि. लांडगे यांनी  ‘दशक' मध्ये जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

मिळे जीवदान नक्की  हिच दशकची ख्याती,

सेवा पिढी दर पिढी तीनं जोडलीय नाती.

*******

- गो.पि. लांडगे, ज्येष्ठ पत्रकार, धुळे

94227 95910


Post a Comment

0 Comments