निजामपूर:- साक्री तालुक्यातील वासखेडी येथील जिल्हा परिषद शाळेत ८० स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला वासखेडी येथील सामाजिक कार्यकर्ते व स्वामी विवेकानंद राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार प्राप्त मा. भैय्यासाहेब दहिते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेतील शिक्षक मा. बहिरम यांनी तंबाखू, सिगरेट, गुटखा न खाण्याविषयी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना शपथ देण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता पाटील मॅडम, मा. पो पा. दिलीप कुवर, सरपंच स्वाती सोनवणे उपसरपंच पंढरीनाथ बच्छाव, दिगंबर लोटन, गिरीश कुवर, रविंद्र साळुंखे , शिक्षक अनिल बहिरम, पुष्पा साबळे, नमलबाई सुर्यवंशी गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक व तरुण उपस्थित होते.
0 Comments