मालपूर प्रतिनिधी. प्रभाकर आडगाळे. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावात 3 वर्षापासून ग्रामपंचायत मध्ये प्रशासन राज असल्या कारणाने. गावात प्रत्येक वार्डात प्रचंड घाण व दुर्गंधीयुक्त वास गटारी पासून येत असतो. ग्रामसभेत विषय झाला असून घनकचरा मुख्य रस्त्यावर तसाच पडलेला दिसतो. मात्र घंटागाडी सुरू होत नाही ही फारच दुदैवाची गोष्ट आहे.. सत्तेधारी पुढारी असून मालपूर गावात स्वच्छतेवर कोणीच लक्ष घालित नाही. आता पावसाळ्याचे दिवस असून नागरीकांच्या जिवनाशी खेळ खेळू नका. घनकचरा उचला अशी कळकळीची विनंती मालपूरकर जनता प्रशासन असलेल्या आधिकरी यांना सांगत आहेत. जवळच सार्वजनिक शौश्चालय असल्यामुळे डुक्करांची प्रचंड गर्दी दिसून येते . या बाबतीत मालपूर गावाचे कर्तव्यदक्ष प्रशासन श्री. डी.बी पाटील व ग्रामविकास आधिकारी श्री आर.बी. वाघ यांनी जातीने लक्ष घालून घनकचरा कसा स्वच्छ होईल याकडे लक्ष द्यावे याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
0 Comments