Header Ads Widget

**दोंडाईचा येथे पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा**


**दोंडाईचा:* श्री पांडुरंग शिंपी प्रतिनिधी यांचेकडून
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत असलेल्या '१० कोटी व्यसनमुक्त प्रतिज्ञा' अभियानांतर्गत दोंडाईचा शहर पोलीस स्टेशन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दोंडाईचा पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा देण्यात आली.

या प्रसंगी ब्रह्माकुमारी वंदना दीदी यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून देत निरोगी व तनावमुक्त जीवनासाठी अध्यात्माची जोड कशी आवश्यक आहे, याविषयी मार्गदर्शन केले. दोंडाईचा पोलीस स्टेशनचे प्रमुख मा.श्री दिनेश सोनवणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यसनांपासून दूर राहण्याचा आणि समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवण्याचा संकल्प केला.

या कार्यक्रमास बी. के. भालचंद्र भाईजी, बी. के. टीना दीदी, बी. के. बागुल भाई, तसेच बी. के. छोटू भाई यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत करत ब्रह्माकुमारी परिवाराचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments