शिंदखेडा प्रतिनिधी
शिंदखेडा तालुक्यातील नेवाडे येथील ग्रामस्थांचा शिंदखेडा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने महिला देखील उपस्थित होत्या.जोरदार घोषणाबाजी करत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कचेरी चौक मार्गे तहसील कार्यालयात
मोर्चा दाखल झाला.यावेळी ग्रामस्थांच्या वतीने येत्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याबाबत निवेदन तहसीलदार शिंदखेडा यांच्या नावे देण्यात आले सदर निवेदन नायब तहसीलदार शारदा बागले यांनी स्वीकारले. निवेदनात म्हटले आहे की, नेवाडे गावाला
जोडणाऱ्या सुमारे चार किलोमीटर रस्त्याचे काम मंजूर होऊनही अद्याप सुरू झालेले नाही. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत काम मंजूर असून, ९ फेब्रुवारी २०२४ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता.मात्र १८ महिने उलटूनही रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.रस्त्याची दुरवस्था झाल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले असून, नागरिक, विद्यार्थी, शेतकरी तसेच रुग्णांना शिंदखेडा येथे ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.यामुळे अपघातांचाही धोका वाढला असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.यापूर्वी संबंधित अधिकारी व प्रशासनाकडे निवेदने देऊनही प्रश्न सुटलेला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. १३ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत रस्त्याच्या प्रश्नावर ठराव मंजूर करण्यात आला.रस्त्याचे काम तातडीने सुरू करून पूर्ण न केल्यास नेवाडे ग्रामस्थ आगामी सार्वत्रिक निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार टाकतील, असा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनाही देण्यात आल्या आहेत. यावेळी भगवान जाधव, अशोक बागुल चंद्रशेखर जाधव,चंद्रशेखर पवार,निखिल साळुंखे,जितेंद्र जाधव,स्वप्निल साळुंखे, चेतन साळुंखे, रंगराव पवार, सिद्धार्थ साळुंखे यांच्या निवेदनावर सह्या होत्या तर मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सदर निवेदन तातडीने वरिष्ठांना पाठवण्यात येईल असे नायब तहसीलदार शारदा बागले यांनी सांगितले आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
रस्त्याचे काम तातडीने सुरू करून पूर्ण न केल्यास नेवाडे ग्रामस्थ आगामी सार्वत्रिक निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार टाकतील, असा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनाही देण्यात आल्या आहेत. यावेळी भगवान जाधव, अशोक बागुल चंद्रशेखर जाधव,चंद्रशेखर पवार,निखिल साळुंखे,जितेंद्र जाधव,स्वप्निल साळुंखे, चेतन साळुंखे, रंगराव पवार, सिद्धार्थ साळुंखे यांच्या निवेदनावर सह्या होत्या तर मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सदर निवेदन तातडीने वरिष्ठांना पाठवण्यात येईल असे नायब तहसीलदार शारदा बागले यांनी सांगितले आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. मुख्य संपादक भूषण पवार लोकवृत्त मराठी न्युज शिंदखेडा
0 Comments