Header Ads Widget

"वृक्ष हे केवळ आपले सगे-सोबतेच नव्हेत, तर भावी पिढीच्या आरोग्यासाठी आणि शुद्ध हवेसाठी ते निसर्गाची अनमोल भेट आहेत. आज लावलेले प्रत्येक लहान रोपटे उद्याच्या समृद्ध आणि हरित भविष्याची पायाभरणी करेल. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच निसर्गप्रेमाचे संस्कार रुजवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे."- मुख्याध्यापक एस ए वाडिले

"वृक्ष हे केवळ आपले सगे-सोबतेच नव्हेत, तर भावी पिढीच्या आरोग्यासाठी आणि शुद्ध हवेसाठी ते निसर्गाची अनमोल भेट आहेत. आज लावलेले प्रत्येक लहान रोपटे उद्याच्या समृद्ध आणि हरित भविष्याची पायाभरणी करेल. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच निसर्गप्रेमाचे संस्कार रुजवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे."- मुख्याध्यापक एस ए वाडिले

प्रतिनिधी l शिंदखेडा : वृक्षाची सुरू असलेली बेसुमार कत्तल आणि वृक्षारोपणाचे होत असलेले दुर्लक्ष याचा थेट परिणाम होवून पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. त्यासाठी वृक्ष लावणे ही काळाची गरज झाली आहे.
वृक्षलागवडीचा संदेश देण्यासाठी  भडणे येथील सी बी देसले विद्यालयालयातील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात वृक्षदिंडी काढली. त्यांच्या या वृक्षदिंडीने गावाकऱ्यांचे लक्ष वेधले होते.
गुरुपौर्णिमा व संत रविदासजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत गुरुवारी कै सी बी देसले विद्यालयात राष्ट्रीय हरित सेना उपक्रम अंतर्गत इको क्लबच्या व सामाजिक वनिकरण विभाग, शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी दि. ३० जुलै रोजी विद्यार्थ्यांनी परिसरात "वृक्षदिंडी’ काढली. त्यात वारी आली वृक्षाची, दिंडी चालली वृक्षारोपणाची या संकल्पनेनुसार वृक्षारोपणाचा संदेश नागरिकांना देण्यात आला.
    प्रसंगी शाळेचे शालेय समिती चेअरमन भबूतराव देसले यांनी पालखीतील विठ्ठल रखुमाई मूर्ती व विद्येची आद्य देवता माता  सरस्वती प्रतिमा आणि वृक्ष पूजन करून व वृक्षदिंडीचे फित कापून उद्घाटन केले. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शालेय परिसरात वृक्षारोपण केले. वृक्षारोपण कार्यक्रमाकरीता विषेश अतिथी भाजपा शहराध्यक्ष संजयकुमार महाजन,
सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी महेश चव्हाण,वनपाल जगमोहन पाटील, पी बी देवरे, वनरक्षक प्रभाकर पाटील, रविंद्र ठाकरे, डी डी सोनार यांना आमंत्रित करून वृक्षारोपण केले व एक पेड माँ के नाम हा उपक्रम राबवला. हातामध्ये टाळ, झांज घेवून वृक्षलागवडीचा आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यासाठी गजर करत ते दिंडीत सहभागी झाले होते. या आगळ्या-वेगळ्या वृक्षदिंडीने परिसरातील सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.
    प्रसंगी सारंग पाटील,जितेंद्र अहिरे,ज्येष्ठ अध्यापिका श्रीमती संगीता वेंदे  यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. वृक्षदिंडी कार्यक्रमाचे नियोजन कलाशिक्षक रावसाहेब बैसाणे यांनी केले. दिंडी साठी मनोहर पाटील, निशांत शिंदे यांनी परिश्रम घेतले. 

कार्यक्रमाला शिक्षकेतर कर्मचारी श्रीमती अलका सूर्यवंशी,शरद पवार, निलेश पवार यांचे अमूल्य सहकार्य लाभले.




Post a Comment

0 Comments