( यादवराव सावंत )प्रतिनिधी:
भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनेमध्ये महिलांच्या नेतृत्वाला अधिक बळ देण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये चंद्रकला सिसोदिया यांची भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या 'प्रदेश सचिव' पदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी सोपवल्याबद्दल सिसोदिया यांनी भाजपच्या सर्व वरिष्ठ नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
या नियुक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना चंद्रकला सिसोदिया म्हणाल्या की, "महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रदादा चव्हाण, प्रदेश महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा मा. चित्राताई वाघ आणि माननीय मंत्री जयकुमार भाऊ रावल साहेब यांच्यासह सर्व वरिष्ठ नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेला हा विश्वास माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे."
"पद ही केवळ जबाबदारी नसून समाजसेवेची संधी"
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, "हे पद म्हणजे केवळ एक स्थान नसून पक्षाने माझ्यावर सोपवलेली मोठी जबाबदारी आणि समाजसेवेची एक उत्तम संधी आहे. पक्षाची ध्येयधोरणे आणि विचारधारा तळागाळातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवणे, महिला सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलणे आणि महिला मोर्चाचे संघटन अधिक बळकट करणे हाच माझा मुख्य संकल्प असेल. जनतेच्या सेवेसाठी मी सदैव प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्यरत राहीन."
निवडीची बातमी समजताच राज्यभरातून ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीद्वारे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून चंद्रकला सिसोदिया यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. या सर्व प्रेम आणि आशीर्वादाबद्दल आभार मानताना त्या म्हणाल्या की, "आपल्या सर्वांचे प्रेम आणि विश्वास हीच माझ्या भावी कार्याची खरी ऊर्जा आहे. भाजपची विचारधारा प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी मी कायम कटिबद्ध राहीन."
चंद्रकला सिसोदिया यांच्या या निवडीबद्दल भाजप पक्षातील विविध स्तरांतून आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0 Comments