यावर्षी विठुरायाच्या कृपेने चांगला पाऊस पडावा शेतकऱ्यांच्या शिवारात सुखसमृद्धी नांदावी भरघोस उत्पन्न मिळावे अशी प्रार्थना भगवंत पांडुरंग विठ्ठलाच्या चरणी करण्यात आली तहसीलदार नितीन कुमार देवरे शिंदखेडा,,,,,,,,
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भक्तिमय वातावरणात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिंदखेडाचे तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची विधीवत पूजा अभिषेक करून महाआरती संपन्न झाली,
मंदिराचे ग
पुरोहीत राजेंद्र महाराज यांच्या मंत्र उपचाराने झालेल्या या पूजेमुळे मंदिर परिसर भक्ती रसात नाऊन निघाला तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्या समवेत भडणे येथील अजय बोरसे व त्यांच्या सह पत्नीला महाआरतीचा मान देण्यात आला विठ्ठल रुक्मिणी चरणी सर्वांच्या सुख समृद्धीसाठी तसेच तालुक्याच्या यावर्षी चांगला पाऊस व्हावा यासाठी प्रार्थना करण्यात आली याप्रसंगी सकाळी गावातून ग्रामस्थ व महिला वर्ग भजनी मंडळाच्या सहभागाने पारंपरिक ध्वज मिरवणूक काढण्यात आली टाळ मृदुंगांच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकारामाच्या जय घोषात विठ्ठल मंदिरात भगवा ध्वज खांद्यावर घेऊन गावातून मिरवणूक काढण्यात येऊन ध्वज मंदिरावर कळशावर बांधण्यात आला त्यानंतर मंदिरात भजन हरी संकीर्तन व धार्मिक कार्यक्रमांनी भाविक मंत्रमुग्ध झाली भाविकांच्या सेवेसाठी डॉ युवराज देसले यांच्या कडुन भाविकांना केळी वाटप करण्यात आले दीवस भर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती कार्यक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष डॉ देवेंद्र पाटील माजी सरपंच भबुतराव पाटील मा जि प सदस्य धनंजय मगळे माजी सरपंच अशोक देसले कथेसिंग गिरासे नागो पाटील पुरुषोत्तम गोसावी अशोक माळी जगतसिंग गिरासे मनोज पाटील चुडामन पाटील विशाल माळी शिवाजी माळी धनराज पाटील विठोबा पाटील मंडळ अधिकारी मनोज गोसावी योगेश बागुल तसेच भडणे पोलीस पाटील युवराज माळी यांच्यासह ग्रामस्थ महिलावर्ग भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पोलीस पाटील युवराज माळी यांच्या हस्ते तहसीलदार नितीन कुमार देवरे यांचा गावकऱ्यांतर्फे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला धार्मिक श्रद्धा सामाजिक एकोपा आणि वारकरी परंपरेच्या संगम घडविणारा हा सोहळा भक्तांसाठी अविस्मरणीय ठरला
0 Comments