Header Ads Widget

*दोंडाईचा येथे मुख्यमंत्री जन-आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ४०० रुग्णांना विविध वैद्यकीय सेवांचा लाभ*



दोंडाईचा (दि. २४ जुलै २०२६) – उपजिल्हा रुग्णालय, दोंडाईचा येथे आज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुख्यमंत्री जन-आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत एकूण ४०० रुग्णांनी विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला.
शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक, धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोंडाईचा उपनगराध्यक्ष विजय पाटील, रुग्ण कल्याण कार्यकारी समितीचे सदस्य प्रविण महाजन, शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे नियामक समितीचे सदस्य जितेंद्र गिरासे गटनेते निखिल जाधव,नगरसेवक हितेंद्र महाजन, ज्येष्ठ नागरिक के. एम. अग्रवाल, अभ्यागत समितीचे सदस्य रवि अहिरे तसेच पत्रकार रणजित राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले.उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी प्रास्ताविकात सर्व मान्यवरांचे स्वागत करून शिबिराच्या आयोजनामागील उद्दिष्ट स्पष्ट केले. रुग्ण कल्याण समितीचे प्रविण महाजन यांनी सांगितले की आदरणीय मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे सर्वसामान्य नागरीकांना विविध प्रकारच्या महसुल विभागातर्फे महाराजस्व अभियान राबवुन विविध दाखले वितरित करण्यात येत आहेत तसेच आरोग्य शिबिरे राबवुन एकाच छताखाली विविध आरोग्य सेवा उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांना योग्य निदान व उपचाराची दिशा मिळेल, असे सांगून अधिकाधिक रुग्णांना सेवा देण्याचे आवाहन केले.
शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे यांनी शासनाच्या अशा लोकहितवादी उपक्रमांचे कौतुक करत मंत्री जयकुमार रावळ यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने सामाजिक कार्य राबविले जात असल्याचे नमूद केले. तसेच जिल्हा शल्य चिकित्सकांनी योग्य नियोजन करून डॉक्टरांची उपलब्धता करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रविंद्र सोनवणे यांनी जिल्ह्यातील दहा अधिनस्त संस्थांमध्ये जन-आरोग्य शिबिरे आयोजित केल्याची माहिती दिली. शिबिरात निदान झालेल्या कर्करोग व हृदयविकारग्रस्त रुग्णांसाठी शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टीसारख्या सुविधा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असल्याचे सांगून नागरिकांनी आरोग्य कार्ड काढून या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या शिबिरात तपासणी, निदान, सल्ला, औषध वाटप, लसीकरण, रुग्ण भरती, प्रयोगशाळा तपासणी, क्ष-किरण, रक्तदाब व रक्तशर्करा तपासणी, हृदय आलेख (ईसीजी), असंसर्गजन्य आजार नोंदणी व शस्त्रक्रिया पूर्व तपासणी अशा विविध सेवा देण्यात आल्या.शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. सलमान कुरेशी, डॉ. अवनी पाटील, डॉ. तेजस जैन, डॉ. दर्शन पाटील, डॉ. मनीषा भावसार, डॉ. रुचिता पाटील, डॉ. युतीका भामरे, डॉ. पंकज राजपूत, डॉ. अश्विनी भामरे, डॉ. महाले, डॉ. गणेश खैरनार, डॉ. शुभांगी गजभिये, डॉ. अभिषेक पाटील, डॉ. स्नेहल पाटील, डॉ. युगंधर शिसोदे तसेच वरुण चौधरी यांनी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी वैद्यकीय अधीक्षक डॉ. भरत कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले व सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या. याप्रकारची शिबिरे पुढील काळातही विविध प्रसंगी आयोजित करण्याचा संकल्प डॉक्टर, नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments