Header Ads Widget

*महिला शेतकऱ्यांचा पैठणीने सन्मान बाम्हणेतील केशरानंद जिनिंग फॅक्टरीत २८ जुलै रोजी कापूस उत्पादकांना मार्गदर्शन*

मालपूरप्रतिनिधी प्रभाकर आडगाळे.

दोंडाईचा,  शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथील केशरानंद जीनिंग फॅक्टरीत २८ जुलै सकाळी १० वाजता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण आणि कामगंध सापळे वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. कापूस उत्पादनासाठी आधुनिक माहिती आणि कामगंध सापळे हे कपाशी पिकावरील बोंडअळी नित्रणासाठी उपयुक्त ठरणार आहेत. याच कार्यक्रमात कापूस उत्पादक महिला शेतकऱ्यांचा पैठणी साडी देऊन गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक ज्ञानेश्वर आनंदा भामरे यांनी दिली.
शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथील केशरानंद जिनिंग फॅक्टरीचे मालक आणि काँटन फेडरेशनचे संचालक ज्ञानेश्वर भामरे हे कापूस उत्पादनासाठी सतत प्रयत्नशील असतात. केशरानंद जिनिंग फॅक्टरीच्या माध्यमातून ते कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सहकार्य करीत प्रोत्साहन देत असतात. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून गेल्या काही वर्षांपासून केशरानंद जिनिंग फॅक्टरीच्या माध्यमातून कापूस उत्पादकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आणि कामगंध सापळे वितरणाचा कार्यक्रम घेतला जातो. कापूस फुलोऱ्यावर असताना त्यावर अळीचा प्रादुर्भाव होतो. बोंड तयार होत असताना अळी देखील वाढते आणि ती बोंडातील रस शोषून घेते. परिणामी, बोंडाची पुरेशी वाढ होत नाही आणि शेतकऱ्यांना कपाशीचे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. तेव्हा शेतकऱ्यांना तंत्रशुद्द मार्गदर्शन मिळावे आणि बोंडअळीची उत्पत्ती रोखण्यासाठी वेळीच कामगंध सापळे लावले तर बोंडअळीवर नियंत्रण मिळविता येते, केशरानंद जिनिंगच्या आवारात काँटन फेडरेशचे सहकार्य घेत कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमास फेडरेशनचे अध्यक्ष विनय कोटक यांच्यासह पदाधिकारी रवींद्र माणगावे, डॅ. सी. डी. मयी, भुपेंद्रसिंह राजपाल, करूणाकर शेट्टी, महेंद्र अग्रवाल, वाय. जी. प्रसाद, सुधीर कुमार मंत्री, रितू पांड्या, मनिष डागा, जे. बी. जडे, प्रदीपकुमार मध्यान, उज्वल गिरासे, पंकज पाटील, गोपाल अग्रवाल, अरविंद जैन, भावेश शाह, गिरीष नागवी, विजय बियाणी, प्रकाश पाटील, प्रदीप जैन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. शिंदखेडा तालुक्यासह जिल्ह्यातील कापूस उत्पादक पुरूष महिला शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक ज्ञानेश्वर आनंदा भामरे यांनी केले आहे. कार्यक्रमास शिंदखेडा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ज्ञानेश्वर भामरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments