Header Ads Widget

*उत्कृष्ट कामगिरी व कर्तव्यदक्षतेला मान: सिद्धार्थ बैसाणे यांची वनपाल पदी पदोन्नती झाल्याबद्दल दोंडाईचा होमगार्ड पथक यांच्यामार्फत सत्कार*


 दोंडाईचा : महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातील दोंडाईचेतील सिद्धार्थ बैसाणे या होतकरू तरुणाची उत्कृष्ट सेवा कार्याच्या गौरव म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव (अक्राणी)तालुक्यातील बिलगाव येथे नुकतीच 'वनपाल' (Forester) पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या खडतर आणि प्रेरणादायी यशाबद्दल दोंडाईचा होमगार्ड पथक यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

 सिद्धार्थ बैसाणे हे दोंडाईचा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले होमगार्ड प्रवीण बैसाणे यांचे मोठे भाऊ आहेत. त्यांच्या कर्तव्य कठोर आणि प्रामाणिक सेवा कार्याचा जोरावर यश संपादन केलेल्या सिद्धार्थ बैसाणे यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि आपल्या लहान भाऊ याचा लाभलेला सहवासाला दिले. त्यांच्या सत्कार सोहळ्यास दोंडाईचा होमगार्ड पथकाकडून अनिल ईशी, मनोज वाडीले,इरफान सय्यद अमीन शहा,संदीप ठाकूर गणेश शिरसाठ,प्रवीण बैसाणे, सागर पवार,बापू मराठे,मनोज ठाकूर व सर्व होमगार्ड उपस्थित होते. सर्वांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचे अभिनंदन केले आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.

 *आण्णा कोळी दोंडाईचा*

Post a Comment

0 Comments