शिंदखेडा( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :-
समाजसेवा, शिक्षण, आरोग्य आणि जनकल्याण या विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्याची दखल घेत आयझल फाउंडेशन व डॉ. वसीम कुरेशी यांना प्रतिष्ठेचा "स्व. अजितदादा पवार जीवन गौरव पुरस्कार" देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून या विशेष पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील (अमळनेर), माजी आमदार रामकृष्ण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्यामदादा सानेर, समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. इद्रिस कुरेशी आणि इरफान शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. उपस्थितांच्या हस्ते आयझल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना हा गौरव प्रदान करण्यात आला.
या सोहळ्याला आयझल फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य अॅड. तालिब कुरेशी, इंजि. झाकीर कुरेशी, राहील शेख, उबैद खान, गाजी बाबा आणि डॉ. अदनान आदी मान्यवर उपस्थित होते.
या गौरवाबद्दल परिसरातील नागरिक, विविध सामाजिक संस्था व मान्यवरांकडून आयझल फाउंडेशन व डॉ. वसीम कुरेशी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0 Comments