Header Ads Widget

*भिम स्मृती यात्रा निमित्त उत्तर महाराष्ट्र प्रमुख पदाधिकारी ची महत्त्वाची बैठक संपन्न*


दोंडाईचा, शिंदखेडा तालुक्यातील  दोंडाईचा येथे आज दि. २६/७/ २०२६ रोजी दुपारी १२ वाजता दादासाहेब रावल स्टेडियम येथे महत्वपुर्ण बैठक आयोजित करण्यांत आली होती. 
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले आयोजित सर्व पक्षीय व आंबेडकरी संघटना यांची किल्ले लळिंग लांडोर बंगला येथिल भिम स्मृती यात्रा जी दरवर्षी ३१ जुलै रोजी किल्ले लळींग येथे घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला वंदन करण्यासाठी दरवर्षी हजारो लाखोच्या संख्येने भीमसैनिक तेथे येत असतात. आणि त्या निमित्त यात्रेच्या नियोजना साठी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रामभाऊ माणिक यांच्या आयोजनाने उत्तर महाराष्ट्र प्रमुख पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाई चे धुळे जिल्हाध्यक्ष  प्रभाकर भाऊ जाधव, होते प्रमुख उपस्थिती    रि. पा. ई. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश जी मकासरे, धुळे जिल्हा कार्याध्यक्ष शशिकांत वाघ, खानदेश प्रदेश प्रमुख लक्ष्मण जाधव धुळे जिल्हा महासचिव राजू बाबा शिरसाठ प्रेम अहिरे नंदुरबार जिल्हाध्यक्ष अनिलजी कुवर नंदुरबार युवक जिल्हाध्यक्ष बापू ठाकरे  उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष भीमराव अहिरे अशोक शिरसाट शिंदखेडा  तालुकाध्यक्ष तथा मांडळ ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिनिधी कैलास आखाडे, आरावे मा. सरपंच ईश्वर आखाडे संजय पाटोळे संजय कुवर भरत जाधव  शिंदखेडा  नगरसेवक राहुल पाटोळे, अँड. अरविंद मंगासे.दोंडाईचा नगरसेवक अक्षय  चव्हाण, महिला तालुकाध्यक्ष  ज्योती तमाइचे, नंदुरबार तालुकाध्यक्ष जगन्नाथ ठाकरे, नवनित बागाले दामळदा ग्रा पं सदस्य राजु सोनवणे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिंदखेडा  तालुकाध्यक्ष तथा मांडळ ग्रामपंचायतचे सरपंच कैलास आखाडे यांनी केले. तर आभार नगरसेवक रामभाऊ माणिक यांनी मानले या बैठकिला उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments