शिंदखेडा प्रतिनिधी
कारगिल विजय दिवसानिमित्त शिंदखेडा शहरात भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि शहीद जवानांच्या सर्वोच्च बलिदानाला अभिवादन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी
महाराज चौक येथे आयोजित कार्यक्रमात कारगिल युद्धातील वीर जवानांसह देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिंदखेडा तालुक्यातील आजी-माजी सैनिकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे सदर कार्यक्रमास उपस्थितांनी शहीदांच्या स्मृतींना अभिवादन करत राष्ट्रसेवेची भावना कायम जपण्याचा संकल्प व्यक्त केला.कार्यक्रमात देशभक्तिपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. "भारत माता की जय", "वंदे मातरम्" आणि "अमर रहे अमर रहे वीर जवान अमर रहे " अशा घोषणांनी वातावरण देशभक्तीमय झाले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी कारगिल युद्धातील वीर जवानांच्या शौर्याचा गौरव करत, त्यांच्या बलिदानामुळेच देशाची अखंडता आणि सुरक्षितता अबाधित असल्याचे सांगितले. तसेच नव्या पिढीने शहीदांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन राष्ट्रप्रेमाची भावना जोपासावी, असे आवाहन करण्यात आले.कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे शिंदखेडा शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.या कार्यक्रमास आजी-माजी सैनिक संघटनेचे सुभेदार प्रकाश जोशी,हवलदार शांताराम जाधव हवलदार भुषण मराठे,नायक कैलास परदेशी,नायक नथू सूर्यवंशी,नायक चंद्रकांत देसले,नायक सोमनाथ बडगुजर,सिग्नल मॅन ज्ञानेश्वर गिरासे उपस्थित होते.यामध्ये सुभेदार प्रकाश जोशी यांनी १९९९ च्या कारगिल युद्धात द्रास व कारगिल सेक्टरमध्ये लढणाऱ्या जवानांना राशन व युद्धसामग्रीचा पुरवठा करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली होती.हवालदार शांताराम जाधव यांनी सियाचीन ग्लेशियरमध्ये सर्व्हे हवालदार म्हणून आर्टिलरीच्या तोफगोळ्यांसाठी अचूक दिशा निश्चित करण्याचे महत्त्वाचे कार्य केले.नायक कैलास परदेशी यांनी EME मध्ये मेकॅनिक म्हणून उधमपूर ते कुपवाडा दरम्यान सैनिकांच्या ताफ्यातील रिकव्हरी वाहनांची जबाबदारी सांभाळून युद्ध मोहिमेला मोलाचे योगदान दिले.तर नायक नथू सूर्यवंशी यांनी बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये इंजिन फिटर व जनरेटर मेकॅनिक म्हणून रिझर्व्ह पार्टीमध्ये सेवा बजावत युद्धकाळात आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी या सर्व माजी सैनिकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.तसेच कारगिल युद्धातील वीर जवानांच्या शौर्याला व सर्वोच्च बलिदानाला अभिवादन करत देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश चौधरी, तालुका उपप्रमुख भालचंद्र पाटील कामगार सेनेचे जिल्हा उपप्रमुख विठ्ठल पाटील तालुकाप्रमुख भूषण पवार, ज्येष्ठ शिवसैनिक सुनील पाटील,शहर प्रमुख सोनू वाघ, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष संजय कुमार महाजन, नगरसेवक ज्ञानेश्वर सकट, नगरसेवक प्रतिनिधी गुलाब सोनवणे, मांग गारोडी समाजाचे प्रदेश सचिव बबन सकट,व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे पदाधिकारी, गृहरक्षक दलाचे जवान, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments