Header Ads Widget

बेटावदच्या श्री. एफ. एम. ललवाणी माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी असद मन्यार शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र.


​बेटावद वार्ताहर 
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ७ वी) २०२६ च्या निकालात बेटावद येथील श्री. एफ. एम. ललवाणी माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी असद रईस मन्यार याने उज्ज्वल यश संपादन केले आहे
​असद याने या परीक्षेत ३०० पैकी तब्बल १९६ गुण (६५.३३ टक्के) मिळवून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला आहे त्याने प्रथम भाषा व गणित विषयात १०६ गुण, तर तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणीत ९० गुण प्राप्त केले आहेत
​असद याच्या या यशाबद्दल त्याचे पालक, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व ग्रामस्थांकडून कौतुक केले जात असून त्याच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments