बेटावद प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील बायपास रोडवरील एस. कुमार लॉन्स येथे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी भाऊराव बागुल यांच्या 'संघर्ष' या आत्मकथा'संघर्ष या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला सेवानिवृत्त पोलीस अधिकारी भाऊराव बागुल हे बेटावद पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेले भिलाली येथील रहिवासी आहेत
या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळायात बेटावद येथील एस. कुमार पेंटर यांचेही मोलाचे योगदान लाभले आहे
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उद्योगपती पाहुबाभाई नरोत्तमभाई बागुल हे होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जीवन जगदाळे यांनी केले प्रास्ताविकात त्यांनी संघर्ष या आत्मकथेविषयी सविस्तर विवेचन करून पुस्तकाचे महत्त्व पटवून दिले त्यानंतर संघर्षकथेचे लेखक भाऊराव बागुल यांनी आपल्या मनोगतातून आत्मकथा लिहिण्यामागची पार्श्वभूमी आणि हा लिखाण प्रपंच का सुचला याविषयीच्या भावना उपस्थितांसमोर मांडल्या
या सोहळ्यास सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी भागवत सैंदाणे, शहाद्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव पाटील, पितांबर देवरे गुरुजी, सेवानिवृत्त प्राचार्य प्रदीप नवसारे, प्रा. जीवन जगदाळे, एन. डी. माळी, भरतभाई पटेल, कैलास भावसार, नवनीत शिंदे, प्रल्हाद सोनवणे यांसह विविध क्षेत्रांतील सुमारे २५० महिला व पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
उपस्थित काही मान्यवरांनी पुस्तकावर व लेखक भाऊराव बागुल यांच्या जीवनप्रवासावर आपली मनोगते व्यक्त केली
अध्यक्षीय भाषणात उद्योगपती पाहुबाभाई बागुल यांनी लेखकाच्या संघर्षाचे कौतुक करून पुस्तकास शुभेच्छा दिल्या
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. दीपक माळी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सुरेश जाधव यांनी मानले शेवटी राष्ट्रगीताने या यशस्वी आणि प्रेरणादायी सोहळ्याची सांगता झाली.
0 Comments