बेटावद प्रतिनिधी
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आर एस बि के (RSBK) अंतर्गत श्री. फ. मु. ललवाणी माध्यमिक विद्यालय बेटावद येथे नुकतीच विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी यशस्वीरीत्या पार पडली. आरोग्य अधिकारी आणि त्यांच्या पथकाकडून शाळेतील विद्यार्थ्यांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले
शालेय वयापासूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावे आणि संभाव्य आजारांचे वेळेत निदान व्हावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
तपासणीदरम्यान आरोग्य पथकाने विद्यार्थ्यांची आरोग्य आणि इतर सर्वसाधारण तपासणी केली तसेच, चांगल्या आरोग्यासाठी आहार, स्वच्छता आणि दिनचर्या कशी असावी, याबाबत डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.
0 Comments