Header Ads Widget

आदित्य वाडिलेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश


 बेटावद प्रतिनिधी 
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSE) इ. ४ थी - २०२६ मध्ये शिरपूर येथील विद्यार्थ्याने उज्वल यश संपादन केले आहे.

जनता शिक्षण प्रसारक संस्था ,बेटावद येथील माध्यमिक शिक्षक श्री. दीपक वाडिले यांचे चि.आदित्य दीपक वाडिले याने या परीक्षेत ३०० पैकी २३२ गुण (७७.३३%) मिळवून यशाचे शिखर गाठले आहे.

आदित्य हा आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालय, शिरपूर येथे शिक्षण घेत आहे. त्याने पेपर-१ प्रथम भाषा व गणित मध्ये ११८ तर पेपर-२ तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी मध्ये ११४ गुण प्राप्त केले आहेत.

आदित्य हा मूळ बेटावद येथील रहिवासी असून सध्या कुटुंबासह शिरपूर येथे वास्तव्यास आहे. त्याच्या या यशाबद्दल आर. सी. पटेल विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच जनता शिक्षण प्रसारक संस्थेचे पदाधिकारी यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

त्याच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments