*दोंडाईचा:* (श्री पांडुरंग शिंपी प्रतिनिधी यांचेकडून) जितो लेडीज विंग दोंडाईचा यांनी जितो राष्ट्रीय समीक्षा 2024–26 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत दोन प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार पटकावून दोंडाईचा आणि संपूर्ण रोम झोनचे नाव देशभरात उज्ज्वल केले.
देशभरातील 97 चॅप्टर्स व इनिशिएटिव्हज यांच्या सहभागातून झालेल्या या राष्ट्रीय मूल्यांकनात जितो लेडीज विंग दोंडाईचा यांनी गेल्या दोन वर्षांत केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे राष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख निर्माण केली.
राष्ट्रीय स्तरावरील 6 पुरस्कारांच्या नामांकनांमधून डिग्निटरी पुरस्कार मिळवणारी दोंडाईचा ही एकमेव इनिशिएटिव्ह ठरली. महिलांना वैयक्तिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
तसेच "सक्षम प्रकल्प" अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या "स्किलशाळा" या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट कार्यक्रम हा मानाचा पुरस्कार मिळाला. या कार्यक्रमाद्वारे महिलांना कौशल्य विकास, स्वावलंबन आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यात आले. या यशामध्ये शीतलजी दुग्गड नॅशनल चेअरपर्सन जीतो लेडीज विंग, जेएलडबल्यु नॅशनल कोअर कमिटीच्या सर्व सदस्या, प्रकल्प संयोजिका प्रियंका , रोम झोन संयोजिका डिंपल पगारीया, राजेंद्र जैन, तृप्ती कर्णावट ,मालेगांव चे हरकचंद जैन, अमित गोसर, हेमंत मोदी, सुदर्शन छल्लाणी तसेच प्रशासकीय टीममधील मेघा मॅडम, श्वेता मॅडम आणि अश्विनी मॅडम
यांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
या यशामागे चेअरपर्सन सौ. सुगंधा जैन चीफ सेक्रेटरी हर्षा कांकरिया तसेच राजश्री मुनोत, पूनम कर्नावत, डॉ. कल्याणी मुनोत, पूनम बाफना, सपना जैन, ममता गुलेच्छा, नम्रता कावड, समता कवाड आणि प्रियंका बाफना यांच्यासह संपूर्ण जितो लेडीज विंग दोंडाईचा टीमचे अथक परिश्रम, उत्कृष्ट नियोजन आणि समर्पण आहे.
महिला सक्षमीकरण, उद्योजकता, कौशल्य विकास या क्षेत्रात सातत्याने केलेल्या कार्यामुळे दोंडाईचा युनिटला हा राष्ट्रीय बहुमान मिळाला आहे.
0 Comments