Header Ads Widget

*सरकार साहेब रावल यांच्या वाढदिवसानिमित्त दोंडाईचा येथे भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन*

दोंडाईचा (प्रतिनिधी) – शहरातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचारासह मोफत औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
या शिबिराचे आयोजन भारतीय जनता पार्टी, दोंडाईचा शहर व हर्षल सर्जिकल हॉस्पिटल, सुरत यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री मा. ना. जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते मा. श्री. सरकारसाहेब रावल हे राहणार आहेत.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्षा माँसाहेब नयनकुँवर रावल, उपनगराध्यक्ष विजय पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे तसेच हर्षल सर्जिकल हॉस्पिटलचे संचालक डॉ. हर्षल मिस्त्री (सुरत) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हे शिबिर रविवार दिनांक 02 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8 ते सायं. 4 वाजेपर्यंत रोटरी भवन, दोंडाईचा येथे आयोजित करण्यात आले आहे.
शिबिरामध्ये खालील प्रकारच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध असणार आहेत:
लॅप्रोस्कोपिक सर्जरी
कॅन्सर सर्जरी
न्यूरो व स्पाइन सर्जरी
ईएनटी सर्जरी
गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सर्जरी
बाल चिकित्सा सर्जरी
ऑर्थोपेडिक व जॉइंट रिप्लेसमेंट
अ‍ॅक्सिडेंटल व ट्रॉमा सर्जरी
किडनी व स्टोन सर्जरी
व्हॅस्क्युलर सर्जरी
एंडोस्कोपी
याशिवाय रक्तदाब, रक्तातील साखर, इतर प्राथमिक तपासण्या मोफत करण्यात येणार असून सर्व रुग्णांना उपचारासह मोफत औषधे दिली जाणार आहेत.
या उपक्रमाचे आयोजन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रविण महाजन, शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे व इतर पदाधिकाऱ्यांनी केले असून नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments