Header Ads Widget

अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी या विद्यालयात नुकताच गुरु पौर्णिमा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी

दिनांक - २९/०७/२०२६ वार बुधवार सुजाण नागरिक सा.प्रतिनिधी श्री.सी.जी.वारुडे 
          शिंदखेडा तालुक्यातील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी या विद्यालयात नुकताच गुरु पौर्णिमा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
         सविस्तर वृत्त असे की, माता तुळजाभवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित, अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी या विद्यालयात गुरूपौर्णिमा कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्रेरणास्रोत मुख्याध्यापक आदरणीय आबासाहेब श्री.एस.ए.कदम सर व प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आबासाहेब श्री.जे.बी.पाटील व संचालिका श्रीमती बी.जे.पाटील मॅडम यांच्यासह अगस्तऋषी मुनीवर यांच्या प्रतिमेचे पूजन करून "गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ; ही " गुरू वंदना " श्लोक गायन करण्यात आले.
       नंतर  विद्यार्थ्यांनी गुरूंविषयीची  कृतज्ञता व्यक्त केल्या नंतर विद्यालयातील शिक्षक -श्री.पी.आर.पाटील, श्री.एस.एस.पाटील,श्री.सी.जी.वारूडे,आर.बी.गवळे, श्रीमती भारती मॅडम, श्री पी.जे.पाटील श्री.एम.एआदिंनी गुरूपौर्णिमा व गुरूंविषयीची महत्त्व पटवून दिलेत 
       शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्रेरणास्रोत मुख्याध्यापक आदरणीय आबासाहेब, श्री.एस ए.कदम यांनी  रामायण -वाल्मिकॠषी, महाभारत - व्यासमुनी, अगस्तमुनी ऋषी, साधुसंत, गुरु-शिष्य द्रोणाचार्य-एकलव्य  थोर समाज सुधारक, विचारवंत व आई- वडील, गुरू -शिष्यनाते,  मित्र परिवार  व " ज्यांनी ज्यांनी प्रत्येक वळणावर चालायला शिकवलं बोलायला शिकवलं,संस्कार दिले आणि जीवन जगायला शिकवलं, असे आपले आई-बाबाच पहिले आणि खरे गुरु आहेत  ज्ञान, प्रेरणा, शिक्षण, मार्गदर्शन, संस्कार दिलेत...
    "गुरु हेच जीवनाचे खरे 'मार्गदर्शक 'होय"! 
  "गुरू म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड,लोखंडाचे सोनं करणाऱ्या गुरूंना कोटी कोटी प्रणाम!..इ.विषयीचे महत्त्व पटवून दिले.
        यावेळी कार्यक्रमास वरील मान्यवर मा.मुख्याध्यापक, संस्थापक अध्यक्ष,संचालक मंडळ , शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद विद्यार्थीवर्ग, पालक वर्ग इत्यादिंच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले होते.
      यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सी.जी वारूडे यांनी केले तर आभार प्रदर्शन - श्री.आर.बी.गवळे यांनी मानले. व कार्यक्रम यशस्वीतेसाठी - जे एस.कदम, एम वाय पाटील, डी.डी.कदम , पी.एस.सिसोदे , पी.डी.खोंडे या सर्वांनी परिश्रम घेतले व  कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम् या राष्ट्रीय गीताने करण्यात आले.

Post a Comment

0 Comments