Header Ads Widget

*​निमगूळ येथे ‘कृषी माऊली सोहळा’ उत्साहात संपन्न; १०० गरजू महिलांना कृषी साहित्याचे मोफत वाटप* 👉*​ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चाचा स्तुत्य उपक्रम*

​शिंदखेडा (यादवराव सावंत,प्रतिनिधी):
महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते तथा  मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा (धुळे ग्रामीण) यांच्या वतीने समाजसेवेचा संकल्प जपत शिंदखेडा तालुक्यातील निमगूळ ग्रामपंचायत सभागृहात "कृषी माऊली सोहळा" अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महिला सक्षमीकरण, शेतकरी कुटुंबांना आधार आणि ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या या उपक्रमांतर्गत १०० गरजू शेतकरी महिलांना मोफत कृषी साहित्याचे वाटप करण्यात आले.
​या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. धरती देवरे या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना भाजप महिला प्रदेश सचिव सौ. चंद्रकला सिसोदिया यांनी सांगितले की, "महाराष्ट्रात 'कृषी माऊली सोहळ्या'अंतर्गत एकूण ८ हजार कृषी साहित्यांचे वाटप केले जात आहे. यामध्ये शहरी व ग्रामीण भागात प्रत्येकी ४ हजार संचांचे वाटप होत असून, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील 'निमगूळ' गावाची यासाठी विशेष निवड करण्यात आली आहे." या उपक्रमांतर्गत महिलांना शेतीकामासाठी उपयुक्त छत्री, विळा, सेंद्रिय खत आणि विविध भाजीपाल्यांच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
​कार्यक्रमादरम्यान कृषी विभागाचे प्रतिनिधी श्री. बोरसे यांनी उपस्थित महिलांना शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान आणि शासनाच्या विविध कृषी योजनांची सविस्तर माहिती दिली.
​या प्रसंगी व्यासपीठावर राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते:
​भाजप महिला पदाधिकारी प्रदेश सचिव  चंद्रकला सिसोदिया,प्रदेश सचिव देवयानी बडगुजर,​ निमगूळच्या लोकनियुक्त सरपंच  स्वाती दीपक बागल, उपसरपंच चंद्रानी संदीप ईशी, सौ. स्नेहलता बागुल.
​शिंदखेडा तालुकाध्यक्ष  प्रभाकर पाटील, दोंडाईचा शहराध्यक्ष  जितेंद्र गिरासे, माजी तालुकाध्यक्ष  दीपक बागल.
​ग्रामपंचायत सदस्य  चंद्रकांत बागल,  शिवाजी बागल,  पंकज बागल,  योगेश पारधी, राजेंद्र साळवे,  चंद्रकांत शिरसाठ आणि ग्राम महसूल अधिकारी  जी. आर. चौधरी.
​तसेच भाजप महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्या, गावकरी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
​"सेवेतून समाज... समाजातून समृद्धी!" आणि "महिलांचे सक्षमीकरण – शेतकऱ्यांचा सन्मान – समाजहिताचा संकल्प!" या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत हा कार्यक्रम पार पडला.
​प्रास्ताविक भाजप महिला प्रदेश सचिव  चंद्रकला सिसोदिया तर
​सूत्रसंचालन माजी तालुकाध्यक्ष  दीपक बागल आणि 
​आभार  हर्षवर्धन बागल यांनी मानले.
​सर्व उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि नियोजनामुळे हा सोहळा अत्यंत यशस्वी ठरला.

Post a Comment

0 Comments