Header Ads Widget

शिंदखेडा येथे महसूल दिनानिमित्त तहसील कर्मचाऱ्यांच्या प्रशस्तीपत्र देऊन गौरव

शिंदखेडा व दोंडाईचा येथील तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा  महसूल दिनानिमित्त शिंदखेडा येथील तहसील कार्यालयात शिरपूर उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलिक यांचे हस्ते प्रशस्तीपत्र  पुष्पगुच्छ देऊन  गौरव करण्यात आला  यावेळी शिंदखेडा येथील तहसीलदार नितीन कुमार देवरे अप्पर तहसीलदार सुरेश कोळी नायब तहसीलदार विजय गोस्वामी  ढोले रावसाहेब  आदी उपस्थित होते  कार्यक्रमाचे सुरुवात उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलिक यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी प्रास्ताविक नायब तहसीलदार विजय गोस्वामी

 यांनी केले तर  सूत्रसंचालन मंडळ अधिकारी मनोज गोसावी यांनी केले तर आभार पंकज पाटील यांनी मांडले यावेळी शिंदखेडा तहसील व दोंडाईचा येथील अप्पर तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा  महसूल दिनानिमित्त 16 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शिरपूर उपविभागीय अधिकारी डॉ  शरद मंडलिक तहसीलदार नितीन कुमार देवरे अप्पर तहसीलदार सुरेश कोळी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र पत्र देऊन गौरव करण्यात आला यात निवासी तहसीलदार शारदा बागले संजय राणे सहमहसुल अधिकारी मनोज गोसावी मंडळ अधिकारी श्रीमती स्वाती कोळी श्रीमती अनिता भामरे महसूल सहाय्यक कुंदन चव्हाण नवीन निंबाळकर मनीष कणके ग्राम महसूल अधिकारी भूपेश कोळी कुणाल लिंगायत पूजा सदार पोलीस पाटील युवराज माळी प्रकाश पाटील मुलकी शिपाई रवींद्र बैसाणे महसूल सेवक हर्षल माळी श्रीमती पूनम बागुल यांना महसुली मला निमित्त उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मानित करण्यात येऊन गौरव करण्यात आला यावेळी तलाठी संघटनेतर्फे   शिरपूर उपविभागीय  अधिकारी  डॉ शरद मंडलिक यांचा जिल्हास्तरीय उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला  नायब तहसिलदार विजय गोस्वामी यांचाही मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ  देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आभार पंकज पाटील यांनी मांडले यावेळी शिंदखेडा तालुक्यातील महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments