दिनांक -०९/०८/२०२६ वार रविवार
सुजाण नागरिक सा.प्रतिनिधी श्री .सी.जी.वारुडे
शिंदखेडा तालुक्यातील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात नुकताच क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आता तुळजाभवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित, अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी या विद्यालयात 'क्रांतीदिन' व 'जागतिक आदिवासी दिवस' या दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्रेरणास्रोत मुख्याध्यापक आदरणीय आबासाहेब श्री.एस.ए.कदम सर व प्रमुख पाहुणे -संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आबासाहेब श्री जे बी पाटील यांच्या हस्ते क्रांतिकारक जननायक नायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी आदिवासी गीत नृत्य व क्रांतिकारकांविषयी भाषणे व्यक्त केली त्यानंतर शिक्षकांनी ही क्रांतिकारकाविषयी व आदिवासी गौरव दिनाविषयी मनोगत व्यक्त केले.
शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्रेरणास्रोत मुख्याध्यापक आदरणीय आबासाहेब श्री.एस.ए. कदम यांनी क्रांती जननायक बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड मधील उलिहातु या गावी झाला.१५/नोव्हेंबर १८७५रोजी झाला होता परंतु त्यांना इंग्रज सरकार विषयी अत्यंत तिरस्कार होता व त्यांची गुरु स्वामी आनंद पांडे (गाव- गोड बेडा) यांनी बिरसा मुंडा यांना रामायण महाभारतातील कथा व आयुर्वेदाचे ज्ञान दिले.बिरसा मुंडा म्हणायचे की,"आपल्या धरतीला इंग्रजांच्या जुलमी शासनाच्या साच्यातून मुक्त करण्याची घोर प्रतिज्ञा केली" व त्यांनी शिकार करणे सोडून दिले नंतर गावोगावी जाऊन आदिवासी समाज एकोप्याला आणून समाजातील लोक त्यांना 'धरतीचा देवच' समजायचे.व बिरसा मुंडा म्हणायचे की "मी माझ्या समाजाचा उद्धारकर्ता म्हणून जन्मास आलो आहे इ.विषयी तसेच'एकलव्य - द्रोणाचार्य' या गुरु-शिष्य एकनिष्ठ नातं खान्देशातील सुपुत्र खर्जासिंग नाईक, माता शब्बरी देवी इत्यादींविषयी व 'करेंगे या मरेंगे' व 'चले जाव चळवळ' क्रांतीदिन, जागतिक आदिवासी दिवस व 'पर्यावरण संवर्धन ही एक काळाची गरज' इत्यादीविषयीचे महत्त्व पटवून दिलेत.
यावेळी कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, संचालक मंडळ, मुख्याध्यापक व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू -भगिनी, विद्यार्थी वर्ग इ.उपस्थित होते व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन - श्री आर.बी.गवळे यांनी केले तर आभार प्रदर्शन - श्री महेश पाटील यांनी मानले.व कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम् या राष्ट्रीय गीताने करण्यात आले.
0 Comments